ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथवर सन 2018 मध्ये बॉल टॅम्परिंग प्रकरणात 12 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपद देखील सोडावे लागले होते. पण आता स्मिथचे पुनरागमन होऊन 1 वर्ष लोटले आहे. त्यामुळे तो भविष्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होईल का? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरचा असा विश्वास आहे की ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून स्मिथची निवड करण्याची वेळ आता संपली आहे. ते सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलत होते.
टीम पेन किती काळ खेळणार हे महत्वाचे
स्टीव्ह स्मिथच्या कर्णधारपदाबद्दल बोलताना मार्क म्हणाले की, “टिम पेन किती काळ खेळणार हे महत्वाचे आहे. जर तो 37-38 वर्षाचा होईपर्यंत खेळला, तर स्टीव्हला खूप उशीर होईल. याव्यतिरिक्त,जर पुढच्या वर्षी टिम पेन खराब फॉर्ममध्ये असेल, तर कर्णधार म्हणून स्मिथचा विचार केला जाईल असे मला वाटते.”
कर्णधार म्हणून स्मिथचा करणार नाही विरोध
“हो, काही वर्षांपूर्वी चूक झाली होती. परंतु आजही मला वाटते की तो त्या दिवशी खूप सावध होता आणि मला वाटते की भविष्यात हे पुन्हा घडणार नाही. भविष्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून मी स्मिथचा विरोध करणार नाही.”असेही टेलर पुढे बोलताना म्हणाले.
जेष्ठ क्रिकेटपटू असल्याने झाली पेनची निवड
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनच्या कामगिरीवर बोलताना टेलर म्हणाले की, “मला वाटते की त्याने खूप चांगले काम केले आहे. त्याने कठीण काळात कार्यभार स्वीकारला. त्यावेळी संघात सुधारणा करण्याची वेळ होती. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील ज्येष्ठ क्रिकेटपटू असल्याने त्याची कर्णधारपदी निवड झाली आणि या कार्यासाठी योग्य वेळी तो योग्य माणूस होता, यात शंका नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
ना विराट ना रोहीत हाच पठ्ठ्या टी20 चा सर्वोत्तम खेळाडू; इंग्लंडच्या दिग्गज कर्णधाराकडून कौतुकाची थाप
इरफान पठाण ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या संघाकडून खेळणार क्रिकेट, तेही भारतात नाही तर…
हिंदू देवतेची पूजा केली म्हणून बांगलादेशी क्रिकेटपटूला आली जीवे मारण्याची धमकी
ट्रेंडिंग लेख –
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…