आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये रविवार (20 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्स संघाला मुंबई इंडियन्सकडून 9 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. तसेच चेन्नईची अवस्था या हंगामात खूपच खराब आहे. संघ पॉइंट टेबलमध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे. आतापर्यंत संघाने फक्त 8 सामन्यांमध्ये 2 सामन्यात विजय मिळवला आहे. रविवारी मुंबईकडून झालेल्या पराभवानंतर कर्णधार एम एस धोनीने मोठं वक्तव्य केलं आहे, त्याच्या वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे.
मुंबईकडून झालेल्या पराभवानंतर एम एस धोनीच म्हणणं आहे की, त्यांचे खेळाडू पूर्णरित्या चांगली खेळी करू शकत नाही. त्याचबरोबर तो हे देखील म्हणाला की, ते पुढच्या हंगामासाठी चांगला संघ तयार करण्याच्या तयारीत आहेत. नंतर तो म्हणाला आमचे जेवढे सामने खेळायचे बाकी आहेत त्यामध्ये आम्हाला विजय मिळवावा लागेल. जर आम्ही फक्त सामन्यावर लक्ष केंद्रित केले तर ते चांगले असेल. जर आम्ही काही सामने पराभूत झालो तर आमच्यासाठी पुढच्या हंगामात चांगला संघ तयार करणे महत्त्वाचे असेल.
तो पुढे म्हणाला, आम्ही जास्त खेळाडू बदलण्याचा विचार करत नाही. आता आमच्यासाठी प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणे सर्वात महत्त्वपूर्ण आहे. जर असं नाही झालं तर आमचं हेच लक्ष असेल की, पुढच्या हंगामासाठी 11 चांगले खेळाडू तयार करणे आणि जोरदार पद्धतीने पुनरागमन करणे.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापती झाल्यामुळे संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आले आहे. त्यानंतर सुद्धा चेन्नईची अवस्था सुधारलेली दिसत नाही.






