---Advertisement---

शास्त्रींचा टीम इंडियाला खास सल्ला, ‘जर पराभवाची चव चाखली नाही तर…’

On: शुक्रवार, फेब्रुवारी 28, 2020 5:21 PM
---Advertisement---

क्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना उद्यापासून(29 फेब्रुवारी) हेगली ओव्हल स्टेडियमवर सुरु होणार आहे. सध्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ या कसोटी मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला या कसोटी मालिकेतील पराभव टाळण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय आवश्यक आहे.

या कसोटी सामन्याच्या आधी बोलताना भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले, पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघ आणखी मजबूत झाला असून दुसऱ्या सामन्यात आता आणखी तयारीने उतरेल.

शास्त्री म्हणाले, ‘आम्ही पहिल्या कसोटीत पूर्णपणे पराभूत झाले. पण माझा नेहमीच असा विश्वास आहे की अशा प्रकारचा धक्का अनेकदा चांगला असतो. यामुळे तूमची मानसिकता बदलते. जर तूम्ही पराभवाची चव चाखली नाही तर तूमची मानसिकता जी आहे तीच कायम राहते. इथे, जे काही झाले, ते चांगले आहे. त्यामुळे आम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली.’

तसेच शास्त्री म्हणाले, ‘न्यूझीलंड काय करीत आहे आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी हे आपल्याला माहिती आहे. पराभव एक चांगला धडा होता आणि खेळाडू पुढील आव्हानासाठी तयार आहेत.’

याबरोबरच शास्त्रींनी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आर अश्विन किंवा रविंद्र जडेजा यांच्यातील एकाला अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळेल असे संकेत दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---