भारत आणि पाकिस्तान आशिया चषक 2023 मध्ये शनिवारी (2 सप्टेंबर) आमने सामने आले. मात्र, पावसामुळे सामना निकाली होऊ शकला नाही. दोन्ही संघांना गुण वाटून दिले गेले. पाकिस्तान संघ हा सामना रद्द झाल्यानंतही आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये पोहोचला. शनिवारी रात्री आपल्या हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्याचा वाढदिवस साजरा केला.
पाकिस्तान संघाने आशिया चषक 2023 मधील आपला दुसरा सामना भारताविरुद्ध खेळला, ज्या निकाल लागला नाही. पण भारतासाठी हा आशिया चषकातील पहिला सामना होता. पाकिस्तानसाठी पहिल्या सामन्यात कर्णधार बाबर आझम याने शतक केले होतेच, पण इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) याने मागून येऊन धमाकेदार खेळी केली आणि शतक केले होते. नेपाळविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानला 238 धावांच्या अंतराने विजय मिळवला होता. या सामन्यात शतक करणारा इफ्तिखार रविवारी (3 सप्टेंबर) आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. पाकिस्तान संघाने फॉर्ममध्ये असलेल्या इफ्तिखारचा वाढदिवसा खास बनवण्यासाठी हॉटेलमध्ये केक मागवला होता आणि जोरदार सेलिब्रेशन देखील केले.
https://www.instagram.com/reel/CwuV9RLhhyG/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
इफ्तिखारच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत 4 कसोटी, 16 वनडे आणि 49 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटमधून अनुक्रमे 61, 402, 814 धावा आल्या आहेत.
दरम्यान, आशिया चषकाचा विचार केला, तर भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे संघ ग्रुप ए मध्ये आहेत. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका ग्रुप बी मध्ये आहेत. या सहा संघांपैकी चार संघ सुपर फोरसाठी पात्र ठरणार आहेत. म्हणजेच प्रत्येक ग्रुपमधून प्रत्येकी दोन-दोन संघ सुपर फोरचा भाग असतील.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! तिन्ही फॉरमॅट जावणारा पाकिस्तानी दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त! शेअर केली सविस्तर पोस्ट
कुपदीपनंतर चहलची बागेश्वर धाममध्ये हजेरी! धीरेंद्र शास्त्रींबाबत म्हणाला, ‘मी…’