---Advertisement---

कुपदीपनंतर चहलची बागेश्वर धाममध्ये हजेरी! धीरेंद्र शास्त्रींबाबत म्हणाला, ‘मी…’

Yuzvendra Chahal at Bageshwar Dham
---Advertisement---

भारतीय संघाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल सध्या संघातून बाहेर आहेत. आशिया चषक 2023 साठी त्याला संधी मिळाली नाहीये. याच कारणास्तव चहल निवडर्ते आणि संघ व्यवस्थापनावर नाराज असल्याचे दिसते. त्याची पत्नी धनश्री हिनेही सोशल मीडिया पोस्टमधून नाराजी व्यक्त केली होती. असे असले तरी, चहल संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करतच आहे. अशातच चहलने सिकरच्या बागेश्वर धाममध्ये हजेरी लावली आहे.

भारतीय संघाचा अनुभवी लेग स्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघासाठी महत्वाचा खेळाडू राहिला आहे. मात्र, अलिकडच्या काळात निवडर्ते आणि संघ व्यवस्थापनाकडून त्याच्याकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर फिरकीपटू चांगलाच निराश आहे. अशातच त्याने बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली आहे. चहलने धीरेंद्र शास्त्रींचा आशीर्वाद घेतला असून याठिकाणचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चहलने या भेटीसंदर्भात माहिती दिली. चहलने सांगितल्यानुसार, त्याला धीरेंद्र शास्त्रींशी भेटल्यानंतर चांगले वाटले. दोघांमधील ही पहिली भेट असल्यासारखे वाटलेच नाही, असेही चहलने सांगितले. चहल म्हणाला, “मला वाटत होते की, मी खूप आधीपासून त्यांना ओळखतो. मी नेहमीच टीव्हीवर त्यांना पाहत होतो, आज पहिल्यांदा प्रत्यक्षात भेटलो. टीव्ही आणि खऱ्या आयुष्यात ते एकसारखेच आहेत.” चहलने यावेळी तो लवकरच पुन्हा एकदा बागेश्वर धामला भेट देईल, असेही सांगितले.

दरम्यान, चहलला जरी आशिया चषकासाठी संधी मिळाली नसली, तरी त्याचा सहकारी कुलदीप यादव () आशिया चषक संघाचा बाग आहे. काही दिवसांपूर्वीच कुलदीपने देखील बागेश्वर धामला भेट दिली होती. चाहत्यांच्या मते कुलदीपकडूनच चहलला याठिकाणी जाण्याचा सल्ला मिळाला असावा.

https://www.instagram.com/p/CwrsR9JLend/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

तत्पूर्वी मागच्या वर्षभरापासून भारतीय संघातील खेळाडू चांगलेच धार्मिक झाले आहेत. सर्वात विराट कोहली उज्जैनच्या माहाकालेश्वर मंदीराला भेट दिली होती. त्यानंतर संघातील एकापाठोपाठ एक खेळाडू उज्जैनमध्ये दिसले आहेत. (Yuzvendra Chahal went to Bageshwar Dham and met Dhirendra Shastri)

महत्वाच्या बातम्या – 
मूर्ती लहान पण कीर्ती महान! ईशानचा रौफच्या चेंडूवर जबरदस्त षटकार, पाहा व्हिडिओ
सातत्यपूर्ण असूनही वर्ल्डकपमधून ईशानचा पत्ता कट? धक्कादायक कारण समोर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---