2019 विश्वचषकात रविवारी(16 जून) भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध 89 धावांनी विजय मिळवला. या विजयात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.
हा सामना संपल्यानंतर रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याला पाकिस्तानच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला ‘सध्या संघर्ष करणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांना तू काय सल्ला देशील?’
यावर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा गमतीने म्हणाला, ‘मी जर पाकिस्तानचा प्रशिक्षक झालो तर मी सांगेल. आत्ता मी हे कसे सांगू.’
https://twitter.com/anirudhkalia/status/1140476584144412672
या सामन्यात रोहितने 113 चेंडूत 140 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहितचे हे वनडे क्रिकेटमधील 24 वे शतक आहे. रोहितला या शतकी खेळीमुळे या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.
त्याचबरोबर 2019 विश्वचषकातील हे रोहितचे दुसरे शतक आहे. त्याने याआधी दक्षिण आफ्रिका विरुद्धही नाबाद 122 धावांची शतकी खेळी केली आहे. तसेच त्याचे या विश्वचषकात दोन शतकांसह 319 धावा झाल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहलीचा हा खास फोटो होतोय जोरदार व्हायरल
–इंग्लंड संघाला मोठा धक्का; हा महत्त्वाचा खेळाडू पडला दोन सामन्यांतून बाहेर
–रोहित शर्मा म्हणतो, हा खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार, पहा व्हिडिओ