Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऍलेक्स हेल्सचे इंटरनॅशनल लीग टी20तील पहिले शतक, पाहा इतर स्पर्धेतील शतकवीरांची यादी; गेलचा दोनदा समावेश

ऍलेक्स हेल्सचे इंटरनॅशनल लीग टी20तील पहिले शतक, पाहा इतर स्पर्धेतील शतकवीरांची यादी; गेलचा दोनदा समावेश

January 21, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Alex-Hales

Photo Courtesy: Twitter/ILT20Official


शुक्रवारी (दि. 20 जानेवारी) आंतरराष्ट्रीय लीग टी20 स्पर्धेतील 9वा सामना अबू धाबी नाईट रायडर्स विरुद्ध डेझर्ट वायपर्स संघात पार पडला. या सामन्यात डेझर्ट संघाने मोठा विजय साकारला. या सामन्यातील कामगिरीसाठी ऍलेक्स हेल्स याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, या सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे त्याच्या नावावर जबरदस्त विक्रमाची नोंद झाली आहे. तो या स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू बनला आहे.

आंतरराष्ट्रीय लीग टी20 या स्पर्धेचा हा पहिलाच हंगाम असून ही स्पर्धा 13 जानेवारी ते 12 फेब्रुवारी, 2023 यादरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या 8 सामन्यात कुणालाही शतक झळकावता आले नव्हते. मात्र, 9व्या सामन्यात स्पर्धेच्या पहिल्या हंगामातील शतक झळकावण्याचा मान ऍलेक्स हेल्स (Alex Hales) याने मिळवला. या सामन्यात अबू धाबी नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या डेझर्ट वायपर्स संघाने निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 219 धावा चोपल्या. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अबू धाबी संघाचा डाव 15.1 षटकात 108 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे डेझर्ट संघाने 111 धावांचा मोठा विजय साकारला.

ऍलेक्स हेल्सचे शतक
प्रथम फलंदाजी करताना डेझर्ट वायपर्स संघाकडून ऍलेक्स हेल्स सलामीला उतरला होता. त्याने यावेळी 59 चेंडूत 110 धावांचे सर्वाधिक योगदान दिले. त्याने या धावा करताना 6 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्या या खेळीमुळे त्याने आंतरराष्ट्रीय लीग टी20 (International League T20) स्पर्धेतील पहिले शतक झळकावले.

A century to remember! 💯

Seven 4s. Six 6s. 110 from 59 balls. A dominant performance by @AlexHales1 has set the bar high in #ALeagueApart.#DPWorldILT20 #ADKRvDV pic.twitter.com/hC9YwRZs2T

— International League T20 (@ILT20Official) January 21, 2023

इतर टी20 लीगमध्ये पहिले शतक झळकावणारे खेळाडू
याव्यतिरिक्त इतर टी20 लीगमध्ये पहिले शतक झळकावण्याचा मान वेगवेगळ्या दिग्गज खेळाडूंनी आपापल्या नावावर केला आहे. 2008मध्ये इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये पहिले शतक झळकावण्याचा मान ब्रेंडन मॅक्युलम याने पटकावला होता. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेचे पहिले शतक झळकावण्याचा मान डेविड वॉर्नर याने मिळवला होता. तसेच, पाकिस्तान सुपर लीगमध्ये शरजील खान याने पहिले शतक झळकावले होते. याव्यतिरिक्त कॅरिबियन प्रीमिअर लीगमध्ये ख्रिस गेल याने, बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये पुन्हा ख्रिस गेलने, टी20 ब्लास्टमध्ये इयान हार्वेने, लंका प्रीमिअर लीगमध्ये लॉरी इव्हान्सने आणि आता आंतरराष्ट्रीय लीग टी20 स्पर्धेत ऍलेक्स हेल्स याने पहिले वहिले शतक झळकावले. (ilt20 cricketer alex hales created history after hitting 110 runs in 59 balls )

The #DPWorldILT20’s first 1️⃣0️⃣0️⃣ and a lot more cricketing ACTION!

What a match! 🤩#ALeagueApart #ADKRvDV pic.twitter.com/j5QW7nRWqQ

— International League T20 (@ILT20Official) January 20, 2023

टी20 स्पर्धा आणि पहिले शतक झळकावणाऱ्या खेळाडूंची यादी
आयपीएल- ब्रेंडन मॅक्युलम
बीबीएल- डेविड वॉर्नर
पीएसएल- शरजील खान
सीपीएल- ख्रिस गेल
बीपीएल- ख्रिस गेल
टी20 ब्लास्ट- इयान हार्वे
एलपीएल- लॉरी इव्हान्स
आयएलटी20- ऍलेक्स हेल्स*

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडने टाकल्या नांग्या! भारताने अवघ्या 108 धावांवर गुंडाळला पाहुण्या संघाचा डाव
आख्ख्या संघाला जे 11 वर्षात जमलं नाही, ते स्मिथने 5 दिवसात करून दाखवलं; आकडेवारी उडवेल तुमचीही झोप


Next Post
Rohit Sharma Fan moment

रोहितला मिठी मारण्यासाठी चिमुरड्याने केले धाडस, ग्राउंड स्टाफची नजर चुकवत गाठली खेळपट्टी

Rohit-Sharma-And-Shubman-Gill

दुसऱ्या वनडेत भारताच्या गोलंदाज अन् फलंदाजांची हवा! न्यूझीलंडला धूळ चारत मालिका घातली खिशात

Rohit-Sharma

धोनी अन् विराटसारख्या कर्णधारांच्या यादीत रोहितचाही समावेश, बनला 'अशी' कामगिरी करणारा आठवा कॅप्टन

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143