भारतीय संघाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा हा सध्या सुरू असलेल्या इंटरनॅशनल लीग टी20 स्पर्धेत खेळताना दिसत आहे. या स्पर्धेत उथप्पाला क्रिकेटच्या मैदानावर ग्रीन बेल्टसोबत पाहताच, चाहत्यांच्या मनात क्रिकेटमध्ये डब्ल्यूडब्ल्यूई कुठून आला, असा प्रश्न उपस्थित झाला. उथप्पा एखाद्या डब्ल्यूडब्ल्यूई रेसलरप्रमाणे ऐटीत उभा राहून खांद्यावर हिरवा बेल्ट लटकवताना दिसला. त्याचा हा फोटो पाहून चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या. तसेच, क्रिकेटमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईसारखा बेल्ट कसा काय आला? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. चला तर काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया…
झाले असे की, रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) सध्या यूएईमध्ये इंटरनॅशनल लीग टी20 (International League T20) स्पर्धेत खेळत आहे. आयोजकांनी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला सन्मानित करण्यासाठी डब्ल्यूडब्ल्यूई स्टाईलमध्ये बेल्ट देण्याची सुरुवात केली आहे.
मात्र, चाहत्यांसाठी हा बेल्ट मजेचा विषय बनला आहे. ट्विटरवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की, क्रिकेटमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईची एन्ट्री कधी आणि का झाली आहे? क्रिकेटपटूला सामन्यानंतर हा बेल्ट देण्यामागील उद्देश काय आहे? चला तर सविस्तर पाहूयात.
WWE chal rha kya cricket me..🤣🤣
— Harshit (@Harshit__18_) January 16, 2023
खरं तर, आयएलटी20 (ILT20) स्पर्धेत चाहत्यांची आवड जपण्यासाठी आणि या स्पर्धेला जगातील इतर क्रिकेट लीगपेक्षा जरा वेगळे बनवण्याच्या हेतूने खेळाडूंना बेल्ट देण्याची परंपरा सुरू केली आहे. आयएलटी20च्या आयोजनाच्या पहिल्या हंगामात 5 प्रकारचे बेल्ट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयएलटी20मधील वेगवेगळ्या बेल्टचे महत्त्व काय?
आयएलटी20 स्पर्धेत दिले जाणारे 5 बेल्ट म्हणजेच, हिरवा, पांढरा, काळा, लाल आणि निळा बेल्ट होय. जो खेळाडू स्पर्धा संपल्यानंतर सर्वाधिक धावा करेल, त्याला हिरवा बेल्ट दिला जाईल. तसेच, जो खेळाडू सर्वाधिक विकेट्स घेईल, त्याला पांढरा बेल्ट दिला जाईल. मात्र, स्पर्धेदरम्यान हिरवा आणि पांढरा बेल्ट एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूकडे जात राहतो. एकदम आयपीएलप्रमाणे. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) आणि पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) खेळाडूंमध्ये बदलत राहते.
.@robbieuthappa poses with the DP World ILT20 green belt (highest run-getter to date) following his outstanding 79, which took him to the top of the run-getters list. #DPWorldILT20 #ALeagueApart pic.twitter.com/hEus5izVAs
— International League T20 (@ILT20Official) January 16, 2023
आयएलटी20 स्पर्धेला रंजक बनवण्यासाठी बेल्टचा वापर
आयएलटी20 स्पर्धेतही अगदी असेच करण्यात आले आहे. फक्त कॅपची जागा बेल्टने घेतली आहे. प्रत्येक सामन्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पांढरा आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला हिरवा बेल्ट दिला जातो. तसेच, तो बेल्ट खांद्यावर ठेवून खेळाडू मुलाखतीसाठी येतात.
उथप्पाला मिळालेला हिरवा बेल्ट
आयएलटी20 स्पर्धेत दुबई कॅपिटल्स संघाचा रॉबिन उथप्पा याने गल्फ जायंट्सविरुद्ध 46 छेंडूत 79 धावांची वादळी खेळी केली. त्यामुळे त्याच्या नावावर स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याची नोंद झाली होती. त्याने 2 सामने खेळताना 122 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला हा बेल्ट देण्यात आला होता. आता तो या बाबतीत दुसऱ्या स्थानी आला आहे. हा बेल्ट सध्या गल्फ जायंट्स संघाच्या जेम्स विन्स या खेळाडूकडे आहे. त्याने स्पर्धेत 2 सामन्यात 148 धावा चोपल्या आहेत.
A true Captain's innings by @vincey14 makes him the guardian of the green belt (highest run scorer of the tournament currently)!
Here's hoping for more stellar knocks from him…
Book your tickets to #ALeagueApart on : https://t.co/VekRYhpzz6#DPWorldILT20 pic.twitter.com/0vTbPMeBtZ
— International League T20 (@ILT20Official) January 16, 2023
इतर बेल्टचे महत्त्व
काळा बेल्ट आयएलटी20 स्पर्धेची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाच्या मालकाला दिली जाईल. दुसरीकडे, स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडूला लाल बेल्ट दिला जाईल. तसेच, या स्पर्धेत भाग घेणाऱ्या यूएईच्या सर्वोत्तम खेळाडूला हंगामाच्या शेवटी निळा बेल्ट दिला जाईल. (ilt20 green belt cricket or wwe fans confused as robin uthappa poses with green belt know why)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ही नव्या युगाची नांदी! महिला आयपीएलला करोडो मिळाल्याने पोरी झाल्या खूश; म्हणाल्या…
निवृत्तीनंतरही उथप्पाने दाखवला दम! कॅपिटल्ससाठी अवघ्या इतक्या चेंडूत केली 79 धावांची वादळी खेळी