ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याने मान्य केले की, तो आता थकला आहे. ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. पण त्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे वॉर्नर थकला आहे आणि भारत दौऱ्यापूर्वी विश्रांती घेणार आहे. सोमवारी (30 जानेवारी) पार पडणाऱ्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पारितोषिक वितरणासाठीही वॉर्नर उपस्थित राहण्याची शक्यता नाहीये.
डेविड वॉर्नर (David Warner) मागच्या मोठ्या काळापासून एकापाठोपाठ एक मालिका खेळत आहे. शुक्रवारी (27 जानेवारी) अखेर हे सत्र संपले. बीब बॅश लीगमध्ये वॉर्नरचा संघ सिडनी थंडर्स अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला, पण शेवटच्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यापूर्वी वॉर्नरने जिम्बाब्वे, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज या संघाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या. तसेच ऑस्ट्रेलियासाठी टी-20 विश्वचषका संघातही खेळला. वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. नुकत्याच पार पडलेल्या बीबीएलमध्ये वॉर्नरने 6 सामने खेळले. या सर्व सामन्यानंतर वॉर्नरला थकवा येणे सहाजिक आहे.
दरम्यानच्या काळात वॉर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे त्याच्यावरून नेतृत्वाची बंदी मागे घेण्यासाठीही अपील केली होती. नेतृत्तवाची बंदी मागे घेतली जावी यासाठी वॉर्नरने खूप प्रयत्न करून देखील त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. यादरम्यानच्या काळात वॉर्नरला वॉर्नरला मानसिक दृष्ट्या देखील त्रास झाला. अशात विश्रांती करणे त्याच्यासाठी महत्वाचे असेल. मागच्या काही महिन्यांविषयी वॉर्नर म्हणाला, “हे खूप आव्हानात्मक होते. मी खूप थकलो आहे.”
ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यासाठी मंगळवारी (31 जानेवारी) रवाना होणार आहे. त्याआधी वॉर्नरकडे विश्रांतीसाठी पाच दिवसांचा वेळ आहे. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या परितोषिक वितरण कार्यक्रमामुळे यापैकी एक दिवस कमी होणार होता. अशात वॉर्नरने या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. याविषयी माहिती देताना वॉर्नर म्हणाला, “काही खेळाडू आहेत जे सध्या यूएई लीगमध्ये खेळत आहेत आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात सामील होणार नाहीत. माझ्या मते अजून एक रात्र घरीच घालवली तर बरे होईल.” दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून खेळायचा आहे. (“I’m tired…” David Warner’s before India tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॉकी विश्वचषक: टीम इंडियाने केली विजयी सांगता; द. आफ्रिकेला मात देत मिळवले 9 वे स्थान
बिगुल वाजले! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी ऑस्ट्रेलियाचे ‘माइंड-गेम’ सुरू; विराटबद्दल म्हणाले…