यावर्षी यूएई मध्ये आशिया चषक स्पर्धेचा १४ वा हंगाम खेळला जाणार आहे. यावर्यी या स्पर्धेत एकूण ६ संघ १३ सामने खेळतील. २७ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारताला त्याच्या अभियानाची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी करायची आहे. भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. आशिया चषकाच्या इतिहासात अजवर अनेक मोठे विक्रम बनले आहेत. आपण या लेखात अशाच काही महत्वाच्या विक्रमांची नोंद घेणार आहोत.
आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
श्रीलंकन संघाचा दिग्गज सनथ जयसूर्या याने आशिया चषकाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक धावांचे योगदान दिले आहे. त्याने २५ सामन्यात ५३.०४ च्या सरासरीने आणि १०२.५२ च्या स्ट्राईक रेटने १२२० धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचाच कुमार संगकारा आहे. संगकाराने २४ सामन्यात ४८.८६ च्या सरासरीने आणि ८४.५१ च्या स्ट्राईक रेटने १०७५ धावा केल्या. यादीत तिसऱ्या क्रमांकावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. सचिनने या स्पर्धेत भारतासाठी २३ सामन्यात ५१.१ च्या सरासरीने आणि ८५.४७ च्या स्ट्राईक रेटने ९७१ धावांचे योगदान दिले. चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा शोएब मलिक, पाचव्या क्रमांकावर रोहित शर्मा, विराट कोहली सहाव्या क्रमांकावर.
१. सनथ जयसूर्या – १२२० धावा
२. कुमार संगकारा – १०७५ धावा
३. सचिन तेंडुलकर – ९७१ धावा
४. शोएब मलिक – ९०७ धावा
५. रोहित शर्मा – ८८३ धावा
६. विराट कोहली – ७६६ धावा
सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
श्रीलंकन संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मलिंगाने आशिया चषकात खेळल्या १५ सामन्यात एकूण ३३ विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाव मुथैया मुरलीधरन आहे, ज्याच्या नावापुढे ३० विकेट्सची नोंद आहे. तिसऱ्या क्रमांकावरील अजंता मेंडिसच्या नावावर २६ विकेट्स आहेत. यादीत पहिल्या पाच क्रमांकांवर एकही भारतीयाचे नाव नाही. रवींद्र जडेजा २२ विकेट्सह ८ व्या क्रमांकावर आहे.
१. लसिथ मलिंगा – ३३ विकेट्स
२. मुथैया मुरलीधरन – ३० विकेट्स
३. अजंता मेंडिस – २६ विकेट्स
४. सईद अजमल – २५ विकेट्स
५. शाकिब अल हसन – २४ विकेट्स
सर्वोत्कृष्ट गोलंदाज –
आशिया चषकातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा विक्रम गोलंदाजाच्या नाही, तर फलंदाजाच्या नावावर आहे. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागच्या नावावर हा विक्रम आहे. त्याने २०१० मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ६ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या होत्या. यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा सोहेल तनवीर आहे. सोहेलने २००८ साली श्रीलंका संघाविरुद्ध ४८ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या होत्या.
सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज –
भारताचा महत्वाचा फलंदाज विराट कोहलीने २०१२ साली झालेल्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध १४८ चेंडूत १८३ धावांची खेळी केली होती. ही आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा वेगवान दिग्गज फलंदाज यूनिस खान आहे, ज्याने २००४ साली हॉन्गकॉन्ग संघाविरुद्ध १२२ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १४४ धावांची खेळी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम आहे, ज्याने २०१८ साली श्रीलंकाविरुद्ध १५० चेंडूत १४४ धांवांची खेळी केली होती.
१. विराट कोहली – १८३ धावा (विरुद्ध पाकिस्तान, २०१३)
२. यूनिस खान – १४४ धावा (विरुद्ध हॉन्गकॉन्ग, २००४)
३. मुशफिकुर रहीम – १४४ धावा (विरुद्ध श्रीलंका, २०१८)
४. शोएब मलिक – १४३ धावा (विरुद्ध भारत, २००४)
५. विराट कोहली – १३६ धावा (विरुद्ध बांगलादेश, २०१४)
आशिया चषकात सर्वाधिक शतक –
या यादीत सनथ यजसूर्या पहिल्या, कुमार संगकारा दुसऱ्या, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
१. सनथ जयसूर्या – ६ शतक
२. कुमार संगकारा – ४ शतक
३. विराट कोहली – ३ शतक
४. शोएब मलिक – ३ शतक
५. लाहिरु थिरिमाने – २ शतक
६. शिखर धनव – २ शतक
आशिया चषकात सर्वाधिक अर्धशतक –
कुमार संगकारा – १२ अर्धशतक
सचिन तेंडुलकर – ९ अर्धशतक
सनथ जयसूर्या – ९ अर्धशतक
मारवन अटापट्टू – ७ अर्धशतक
नवजोत सिंग सिद्धू – ७ अर्धशतक
अर्जुन रणतुंगा – ७ अर्धशतक
रोहित शर्मा – ७ अर्धशतक
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा-
महत्वाच्या बातम्या –
अँडरसनचा नाद नाय राव! एकाच देशात खेळलेत तब्बल १०० सामने
हरभजनला मारायला हॉटेलच्या रूमपर्यंत गेलेला अख्तर, ‘या’ गोष्टीमुळे पेटला होता वाद
WBC: ‘भारताच्या स्वप्नांचा चुरडा!’ सायना नेहवाल प्री-क्वाटर सामन्यात पराभूत