आशिया चषक 2023 या मुद्यावरून बीसीसीआय आणि पीसीबी अनेकदा आमने सामने आल्याचे पाहायला मिळतेय. जवळपास वर्षभरापासून सुरू असलेला वाद पण अखेर हा वाद आता मिटताना दिसत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार आशिया चषक 2023 पाकिस्तानमध्ये आयोजित होणार आहे. पण भारतीय संघाचे सामने मात्र पाकिस्तानबाहेर आयोजित केले जातील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या मुद्द्यावर ठाम असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रन नजीर याने बीसीसीआयवर काही आरोप केले आहेत.
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) ठरल्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. परंतु , भारतीय संघ आपल्या अटीवर कायम असल्याने, भारताचे सामने पाकिस्तान बाहेर आयोजित केले जातील. भारतीय संघाला यावर्षीच्या आशिया चषकात पाच सामने खेळायचे असून यात किमान दोन सामने पाकिस्तानसोबत असतील. अशात या पाचही सामन्यांसाठी आशियाई क्रिकेट परिषद (ACC) या पाच सामन्यांचे आयोजित पाकिस्तानबाहेर करणार असल्याचे सांगितले जातेय. युएई येथे हे सामने खेळले जाण्याची जास्त शक्यता आहे. याच मुद्द्यावर बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू नजीर म्हणाला,
“बीसीसीआय आणि भारतीय संघाची काय समस्या आहे माहित नाही. त्यांना इथे सुरेक्षेपेक्षा पराभूत होण्याची भीती अधिक वाटते. जगातील सर्व अव्वल संघ येथे खेळून गेले आहेत. सर्व बहाणे बंद करून त्यांनी पाकिस्तानात खेळायला हवे. खेळात राजकारण सुरू झाले की त्यावर पर्याय नसतो.”
भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांशी द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये समोरासमोर येतात. भारतीय संघाने अखेरच्या वेळी पाकिस्तान दौरा 2006 मध्ये केलेला. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानात पाऊल ठेवले नाही.
(Imran Nazir Said BCCI And Team India Coward They Not Playing In Asia Cup 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटमध्ये राजकारण! सूर्याच्या फ्लॉप शोमुळे काँग्रेस नेत्याचा बीसीसीआयवर निशाणा, सॅमसनला मिळाला सपोर्ट
वनडेतील 265 डावांनंतरही चमकतोय ‘किंग’ कोहली, पठ्ठ्याची सरासरी आहे सचिन अन् धोनीपेक्षाही जास्त; वाचाच