---Advertisement---

असा पराक्रम करणारा इम्रान ताहिर दक्षिण अफ्रिकेचा चौथाच खेळाडू!

On: गुरूवार, ऑक्टोबर 4, 2018 3:32 PM
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका संघाचा झिम्बाब्वेविरूद्ध दुसरा वन-डे काल(3 आॅक्टोबर)झाला. दक्षिण अफ्रिकेने हा सामना 120 धावांनी जिंकला.198 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव अवघ्या 78 धावात गुंडाळण्यात दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आले.

ब्लोमफोंटिन येथील मांंगुंग ओव्हल या मैदानावर अफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरने हॅट्रीक घेत झिम्बाॅब्वेचे कंबरड मोडले. हॅट्रीकवीर इम्रानने 6 षटकात 24 धावा देत झिम्बाब्वेचे 6 विकेट घेतल्या.

तत्पुर्वी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कारकीर्दीतील पहिले वहिले अर्धशतक झळकावत दक्षिण अफ्रिकेला सन्मानजनक धावांचे आव्हान झिम्बाॅब्वे समोर ठेवले होेते.

ताहीरने 18 षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सिन विलियम्सला बाद केले. त्यानंतर 20 व्या षटकात  पहिल्याच चेंडूवर  पीटर मूर आणि दुसऱ्या चेंडूवर ब्रॅन्डन मावुताला बाद करत ही कामगिरी केली.

ताहीर हा अफ्रिकेचा हॅट्रीक घेणारा वन-डे मधील चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी चार्ल लॅन्गवेल्ट, जेपी ड्युमिनी आणि कागीसो रबाडा यांनी अशा प्रकारची कामगिरी केली आहे.

2005 – चार्ल लॅन्गेवेल्ट विरुद्ध वेस्ट इंडीज (बार्बाडोस)

2015 – जेपी ड्यूमिनी  विरुद्ध  श्रीलंका (सिडनी)

2015 – कागीसो रबाडा  विरुद्ध बांगलादेश (मिरपूर)

2018 – इम्रान ताहिर  विरुद्ध झिंबाब्वे (ब्लोमफोंटिन)

39 वर्षीय ताहिरने  तिसऱ्यांदा  वन-डे सामन्यात 5 पेक्षा जास्त विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण अफ्रिकेने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील सामना 6 आॅक्टोबरला होणार आहे. त्यानंतर 9 आॅक्टोबरपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment