आज इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील सामन्याने आयसीसीच्या 12 व्या क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हल मैदानावर सुरु आहे.
विशेष म्हणजे या सामन्याचा पहिल्याच चेंडूवर एक इतिहास रचला गेला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार प्रथम गोलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून पहिले षटक फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरने टाकले.
त्यामुळे वनडे विश्वचषकात पहिला चेंडू टाकणारा तो पहिलाच फिरकी गोलंदाज ठरला आहे. याआधी झालेल्या सर्व 11 विश्वचषकात पहिला चेंडू वेगवान गोलंदाने टाकला आहे.
त्याचबरोबर विशेष गोष्ट म्हणजे इम्रान ताहीरने या विश्वचषकातील पहिले षटक टाकताना दुसऱ्याच चेंडूवर इंग्लंडचा आक्रमक सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टोची शून्य धावेवर विकेट घेतली आहे.
पण त्यानंतर जेसन रॉय आणि जो रुटने 106 धावांची दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत इंग्लंडचा डाव सावरला. मात्र हे दोघेही अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच बाद झाले. रॉयला 54 धावांवर एँडिल फेहलूकवायोने बाद केले. तर रुटला कागिसो रबाडाने 51 धावांवर बाद केले.
प्रत्येक विश्वचषकात या गोलंदाजांनी टाकला पहिला चेंडू –
1975 – गोलंदाज – मदन लाल, फलंदाज – जे जेमसन
1979 – गोलंदाज – एँडी रॉबर्ट्स, सुनील गावस्कर
1983 – गोलंदाज – रिचर्ड हॅडली, फलंदाज – ग्रॅमी फॉवलर
1987 – गोलंदाज – व्ही जॉन, फलंदाज – रमीज राजा
1992 – गोलंदाज – क्रेग मॅकडरमॉट, फलंदाज – जॉन राईट
1996 – गोलंदाज – डॉमनिक कॉर्क, फलंदाज – क्रेग स्पेरमन
1999 – गोलंदाज – डॅरेन गो, फलंदाज – सनथ जयसुर्या
2003 – गोलंदाज – शॉन पोलॉक, फलंदाज – ख्रिस गेल
2007 – गोलंदाज – उमर गुल, फलंदाज -ख्रिस गेल
2011 – गोलंदाज – शफिउल इस्लाम, फलंदाज – विरेंद्र सेहवाग
2015 – गोलंदाज – नुआन कुलसेकरा, फलंदाज – मार्टिन गप्टिल
2019 – गोलंदाज – इम्रान ताहिर, फलंदाज – जेसन रॉय
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–जर विश्वचषकात संघांचे गुण सारखे झाले तर घेतला जाणार हा निर्णय
–महा स्पोर्ट्सचे विश्वचषक २०१९साठी कंटेंट डिलीव्हरी प्लटफाॅर्म माझी मराठीबरोबर टायअप
–विश्वचषक २०१९: खेळाडू म्हणून नाही तर क्रिकेटच्या या क्षेत्रात पदार्पण करतोय सचिन तेंडुलकर!






