पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीग खेळवली जात आहे. या स्पर्धेत बुधवारी (३ मार्च) खेळतांना दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीरने खेळभावनेचे सुंदर प्रदर्शन घडवले. या स्पर्धेत मुलतान सुलतान या संघाकडून खेळतांना त्याने विकेट घेतल्यावर नुकतेच निधन झालेल्या ताहीर मुघल, या माजी प्रशिक्षकांना श्रद्धांजली वाहिली.
ताहीर मुघल यांचे १० जानेवारी रोजी वयाच्या ४३व्या वर्षी निधन झाले होते. मुलाचे लाहोरचे असलेल्या ताहीर मुघल यांना डिसेंबर २०२० मध्येच कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्याच्याशी झुंज देतानाच त्यांचा यावर्षी जानेवारी महिन्यात मृत्यू झाला. ताहीर मुघल यांच्या नावे प्रथम श्रेणी कारकिर्दीत एकूण ५०३ विकेट्स आहेत. वेगवगळ्या सहा संघांसाठी आजवर ते खेळले आहेत. त्यांनी वकार युनुस, मोहम्मद आसिफ, शब्बीर अहमद अशा अनेक पाकिस्तानी दिग्गजांसह गोलंदाजी केली आहे.
इम्रान ताहीर याने बुधवारच्या सामन्यात विकेट घेतल्यानंतर या शानदार कारकीर्द असलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकाला श्रद्धांजली वाहिली. इम्रान ताहीरने या सामन्यात क़्वेटा ग्लॅडियेटर्सचा सलामीवीर सईम अय्युबला बाद केले. त्याला बाद केल्यानंतर सेलिब्रेशन करताना ताहीरने आपला टी-शर्ट काढला. ज्याच्या आतील जर्सीवर ताहीर मुघल यांचा फोटो होता. तसेच यावर “माझा भाऊ. तुला खूप मिस करत आहोत. तुझ्या आत्म्याला शांती मिळो”, असे लिहिले होते.
A touching tribute by @ImranTahirSA for Tahir Mughal, the Pakistani ex-cricketer who passed away earlier this year. #HBLPSL6 | #MatchDikhao | #QGvMS pic.twitter.com/TCqoWLT5BO
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 3, 2021
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास इम्रान ताहीरच्या संघाला मात्र पराभव पत्करावा लागला. क़्वेटा ग्लॅडियेटर्सने २२ धावांनी या सामन्यात विजय मिळवला. त्यांनी दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुलतान सुलतान संघाचा डाव १५४ धावांवर संपुष्टात आला. मुलतानच्या संघाकडून कर्णधार मोहम्मद रिझवान वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले.
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ : मोहम्मद सिराजच्या भेदक चेंडूवर बेअरिस्टो निरुत्तर, पायचीत होऊन परतला तंबूत
ब्रेकिंग! पाकिस्तान सुपर लीगला कोरोनाचा फटका; उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित





