---Advertisement---

विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिका हरली पण इम्रान ताहिरने रचला इतिहास

---Advertisement---

लंडन। 2019 विश्वचषकात रविवारी(23 जून) 30 वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने 49 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला जरी पराभव स्विकारावा लागला असला तरी त्यांचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरने विश्वचषकात खास विक्रम केला आहे.

40 वर्षीय ताहिरने या सामन्यात इमाम उल हक आणि फकार जामन या पाकिस्तानच्या सलामी जोडीला बाद केले. त्याबरोबरच त्याने विश्वचषकात 39 विकेट्सही पूर्ण केल्या. त्यामुळे ताहिर विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

त्याने हा विक्रम करताना दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज गोलंदाज ऍलेन डोनाल्ड यांना मागे टाकले आहे. 2003 च्या विश्वचषकानंतर निवृत्ती घेतलेल्या डोनाल्ड यांनी दक्षिण आफ्रिकेकडून विश्वचषकात 38 विकेट्स घेतल्या आहेत.

2019 च्या विश्वचषकात ताहिरने आत्तापर्यंत 7 सामन्यात खेळताना 10 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना 4 विकेट्स घेतल्या. होत्या. हे त्याचे या विश्वचषकातील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन आहे. अफगाणिस्तान विरुद्ध त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला आहे.

2011 च्या विश्वचषकातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला ताहिर त्याच्या कारकिर्दीतील हा शेवटचा विश्वचषक खेळत आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून वनडे विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज –

39 विकेट्स – इम्रान ताहिर

38 विकेट्स – ऍलेन डोनाल्ड

31 विकेट्स – शॉन पॉलॉक

26 विकेट्स – मॉर्ने मॉर्केल

23 विकेट्स – डेल स्टेन

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून आयसीसीने न्यूझीलंड संघाला सुनावली ही शिक्षा

विंडिज विरुद्ध विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह खेळणार नाही, हे आहे कारण

‘हम तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे’: अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे बांगलादेशला आव्हान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment