यावर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज इम्रान ताहिरने हरभजन सिंगच्या भज्जी ब्लास्ट शोमध्ये त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल गप्पा मारल्या.
या गप्पांदरम्यान इम्रानने हरभजनने विनंती केल्यावर नुसरत फतेह अली खान यांची ‘सानू एक पल चेन ना आवे’ ही प्रसिद्ध असलेली कव्वाली म्हटली आहे.
नुसरत फतेह अली खान हे ताहिरचे आवडते गायक असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याने गायलेली कव्वालीही त्याची आवडीची आहे.
Imran Tahir singing a Nusrat Fateh Ali Khan qawwali pic.twitter.com/ctxfZnltr3
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) July 5, 2018
पाकिस्तानमध्ये जन्म झालेल्या ताहिरने दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याआधी इंग्लंडमध्ये 8 वर्ष इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेट खेळले आहे. तसेच त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण 27 संघाकडून क्रिकेट खेळले आहे.
त्याने त्याच्या कारकिर्दीत पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे ताहिर सध्या आयसीसीच्या टी20 गोलंदाजी क्रमवारीत 7 व्या क्रमांकावर आहे.
तसेच त्याने दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 253 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
-रोहित शर्माला मागील तीन सामन्यात हुलकावणी देणारा विक्रम आज करण्याची संधी





