---Advertisement---

हे पोरग भारीय, त्याला संधी देऊन पाहा; जेव्हा ‘या’ भारतीय क्रिकेटरने द्रविडकडे केली होती संजूची शिफारस

---Advertisement---

‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) बऱ्याच नवोदित शिलेदारांना कारकिर्द घडवण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. केवळ नवख्या क्रिकेटपटूंची नव्हे तर कित्येक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचीही कारकिर्द आयपीएलमुळे बहरली आहे. याच आयपीएलमध्ये एक असाही शिलेदार आहे, ज्याची याच मंचावर स्वप्नपुर्ती झाली आहे. तो खेळाडू म्हणजे, ‘संजू सॅमसन’.

आपल्या लक्षणीय फलंदाजी प्रदर्शनाच्या जोरावर अनेकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या या २६ वर्षीय खेळाडूची कारकिर्द घडवण्यात काही भारतीय क्रिकेटपटूंचा मोलाचा वाटा राहिला. एस श्रीसंत आणि राहुल द्रविड हेच तेच दोन भारतीय दिग्गज आहेत.

साल २०१३ मध्ये भारतीय गोलंदाज श्रीसंतने माजी भारतीय फलंदाज द्रविडशी संजूची पहिली भेट करुन दिली होती. यावेळी श्रीसंतने द्रविडला मजेत सांगितले होते की, “या १८ वर्षीय मुलाने स्थानिक पातळीवर माझ्या षटकात ६ षटकार मारले होते. तू याची राजस्थान रॉयल्सच्या ट्रायल्ससाठी निवड कर.”

श्रीसंतच्या विनंतीस मान देत द्रविडने संजूला संधी दिली होती आणि त्याचवर्षी त्याचे राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पणही झाले होते.

आयपीएल २०१३ मध्ये द्रविड राजस्थान संघाचा कर्णधार होता. तर याचवर्षी श्रीसंत स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सापडल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. परंतु श्रीसंतने संजूची द्रविडशी भेट घालून दिल्यानेच संजूसाठी अपेक्षेची किरणे जागी झाली. पुढे आपली मेहनत आणि कामगिरीच्या जोरावर संजूने स्वत:ला सिद्ध केले आणि हाच संजू आज राजस्थान संघाचा संघनायक बनला आहे.

संजूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात कोणालाही न जमलेला विक्रम
एप्रिल १२, २०२१ रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळताना त्याने धडाकेबाज फलंदाजीही केली. एकाकी झुंज देत ६३ चेंडूमध्ये १२ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने ११९ धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची गरज असताना तो झेलबाद झाला आणि संघाला आपल्या नेतृत्वातील पहिला सामना जिंकून देण्यात अपयशी ठरला.

संजूचा संघ विजयी झाला नसला तरी, त्याने एका खास विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळत असलेल्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावे झाला. यापूर्वी अशी कामगिरी कोणीही करू शकले नव्हते.

श्रेयस अय्यरने २०१८ आयपीएल हंगामात प्रथम दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना नाबाद ९३ धावांची खेळी केली होती. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी सध्या मुंबई इंडियन्सचा उपकर्णधार असलेला कायरन पोलार्ड आहे. पोलार्डने २०१९ मध्ये कर्णधार म्हणून आपला पहिला सामना खेळताना ८३ धावांची खेळी केलेली.

महत्त्वाच्या बातम्या-

ख्रिस गेलला बाद केल्यानंतर रियान परागचा आनंद अनावर, केला भन्नाट बिहू डान्स; व्हिडिओ व्हायरल

चेतन सकारियाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर भारतीय दिग्गजाचं भावनिक ट्विट; म्हणाले, ‘भावाच्या आत्महत्येची..’

संजूला स्वत:वर विश्वास असल्याने त्याने जोखीम घेतली; ‘त्या’ विवादीत निर्णयाबद्दल संगाकाराचे मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---