रविवारी (१२ जून) भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. टी-२० मालिकेतील पहिला सामना देखील दक्षिण आफ्रिका संघाला जिंकला होता. फक्त या टी-२० मालिकेतच नाही, दक्षिण आफ्रिका संघासोबत २०२२ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये भारत अपयशी ठरल्याचे दिसले आहे.
दक्षिण आफ्रिका संघ या चालू वर्षात तिसऱ्यांदा भारताविरुद्धची मालिका खेळत आहे. पहिल्या दोन्ही मालिका दक्षिण आफ्रिका संघाने जिंकल्या आहेत आणि आता तिसऱ्या मालिकेत देखील त्यांचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिका संघ सर्वात आधी भारतासोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळला, ज्यामध्ये त्यांना २-१ असा विजय मिळाला. त्यानंतर भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्यांनी क्लीन स्वीप (३-०) दिला. त्यानंतर आता सुरू असलेल्या टी-२० मालिकेत देखील आफ्रिकी संघ २-० ने आघाडीवर आहे आणि त्यांचा संघ मालिका जिंकेल, अशी शक्यता अधिक आहे.
एकंदरीत पाहता दक्षिण आफ्रिकी संघ या संपूर्ण वर्षात भारतावर भारी पडला आहे. रविवारी झालेला पराभव भारतासाठी खूपच लाजिरवाणा होता. कारण हा दक्षिण आफ्रिका संघाकडून भारताला मिळालेला सलग सातवा पराभव ठरला आहे. म्हणजेच वर्षाच्या सुरूवातील कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकल्याच्या नंतर भारताला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध एकही सामना जिंकता आला नाहीये.
तसे पाहिले, तर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना या मालिकेतून विश्रांती दिली गेली आहे. अशात संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी ही युवा खेळाडूंवर आहे, पण ते यामध्ये अपयशी होताना दिसत आहेत.
दरम्यान, उभय संघातील रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्याचा विचार करायचा झाला, तर खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल होती. प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ विकेट्सच्या नुकसानावर १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकी संघाने हे लक्ष्य ६ विकेट्सच्या नुकसानावर आणि १८.२ षटकात गाठले. भुवनेश्वर कुमारने चार षटकात अवघ्या १३ धावा देऊन चार महत्वाच्या विकेट्स घेतल्या, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताने सामना गमावला, पण भुवनेश्वरला ४ विकेट्सने मोठा फायदा, महत्वाच्या यादीत अश्विनला टाकले मागे
नुकसान झालं गड्या! इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचे पब जळून खाक, आर्थिक नुकसानीवर क्रिकेटर भावूक