आशियाई गेम्स 2023मध्ये महिलांसह पुरुषांचे क्रिकेट सामनेही खेळले जाणार आहे. आशियाई गेम्ससाठी निवडलेल्या भारतीय पुरुष संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे असणार आहे. अशातच या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. ऋतुराजच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आशियाई गेम्ससाठी थेट उपांत्यपूर्व फेरीत संधी मिळणार, असे सांगितले जात आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी रँकिंगच्या आधारावर भारतीय पुरुष संघाबाबत आशियाई गेम्सकडून हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार भारतीय पुरुष संघ थेट आशियाई गेम्सच्या उपांत्यपूर्ण सामन्यात खेळेल, जो 5 ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर या सामन्या विजय मिळाला, तर भाताला उपांत्य सामना 6 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. उपांत्य सामन्यात जर भारतीय संघ जिंकला, तर सुवर्णपदकासाठी भारत 7 ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळेल.
आगामी वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषकाचा अंतिम सामना आयोजित केला गेला आहे. पण दुसरीकडे 5 ऑक्टोबरपासून भारतीय संघाला आशियाई गेम्समध्येही खेळायचे आहे. बीसीसीआयने ही अडचण आधीच लक्षात घेत या दोन महत्वाच्या स्पर्धांसाठी दोन संघ निवडण्याची योजना आखली आहे. आशियाई गेम्ससाठी बीसीसीआयकडून संघाची घोषणा केली गेली असून यात सर्व युवा खेळाडूंना निवडण्यात आले आहे. दुसरीकडे वनडे विश्वचषकासाठी अद्याप संघ घोषित झाला नाहीये. पण विश्वचषकाच्या संघात सर्व वरिष्ठ खेळाडूंनी निवडण्यात येणार यात कुठलीच शंका नाही.
Plenty of fresh faces in India's squad for Asian Games 🤩
✍: https://t.co/6a6AowtOoH pic.twitter.com/pP2kZoISq1
— ICC (@ICC) July 15, 2023
आशियाई गेम्ससाठी निवडलेला भारतीय पुरुष क्रिकेट संघ –
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान , अर्शदीप सिंग.
(In Asian Games 2023 Team India will get a chance to play in the quarter-finals directly)
महत्वाच्या बातम्या –
टी-20चा सुपरस्टार वनडेत फ्लॉप! सॅमसनला मिळणार संधी? दोघांच्या आकडेवारीत जमीन-आस्मानाचा फरक
नाद नाद नादच! देवधर ट्रॉफीत रियान परागचं वादळी शतक, 11 सिक्स मारत टीकाकारांची बोलती केली बंद