भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामना (INDvWI ODI Series) बुधवारी (९ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे खेळला गेला. भारतीय संघाने शानदार कामगिरी करत ४४ धावांनी विजय संपादन केला. यासोबतच भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली. भारतीय संघात तीन सामन्यांच्या मालिकेत आता २-० असा पुढे आला आहे. भारतीय संघ विजयाच्या रथावर स्वार असला तरी, संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू व माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli Bad Form) हा मात्र खराब फॉर्मशी झगडत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात तो पुरता अपयशी ठरला. त्याच्या अपयशामुळे कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढली आहे. याच कारणाने रोहित त्याच्याजागी दुसरी कोणाची तिसऱ्या क्रमांकावर वर्णी लावतो का, हे पाहणे रंजक ठरेल.
विराटचा खराब फॉर्म
भारताचा सर्वात अनुभवी फलंदाज तसेच माजी कर्णधार असलेल्या विराटची बॅट सध्या शांत आहे. तो नोव्हेंबर २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावू शकला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही तो पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे ८ व १८ धावा काढत माघारी परतला. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा काही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतो.
या फलंदाजांना मिळू शकते तिसऱ्या क्रमांकावर संधी
रोहित शर्मा याने विराट कोहलीला बाहेर बसवण्याचा निर्णय घेतल्यास मुंबई इंडियन्ससाठी खेळलेल्या तसेच एका मूळच्या मुंबईकर खेळाडूची तिसऱ्या क्रमांकावर वर्णी लागू शकते. आयपीएलमध्ये मुंबईसाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला या क्रमांकावर बढती देण्यात येऊ शकते. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्या व्यतिरिक्त डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) हा देखील या क्रमांकावर आपला दावा सांगेल. या दोघांव्यतिरिक्त मुंबईचा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला देखील तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही खेळाडू रोहित शर्माचे अगदी जवळचे मानले जातात. त्यामुळे कदाचित विराटला बाहेर केल्यास या तिघांना तिसरा क्रमांक आपला करण्याची संधी मिळेल.
महत्वाच्या बातम्या-