सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील टी20 मालिका आणि एकदिवसीय मालिका खेळवून झाल्या आहेत तर 2 कसोटी सामन्यांची मालिका अजून बाकी आहे. भारत आणि बांगलादेश या संघात पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून चट्टोग्राम येथे खेळवला जाईल. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी केएल राहुलवर सोपवण्यात आली आहे. ही मालिका विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे. अशातच भारताला एकदिवसीय सामन्यांमध्ये केलेल्या चूका टाळाव्या लागतील.
विराट -पुजारा यांच्यावर मोठी जबाबदारी
चट्टोग्राम कसोटी सामन्यामध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यावर भारतीय संघासाठी मोठी धावसंख्या उभी करण्याची जबाबदारी असणार आहे. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने नेहमी बांगलादेश संघावर वर्चस्व ठेवले आहे, असे माहितीनुसार स्पष्ट दिसून येते. भारतीय संघ आपला विजयाचा रथ चालत ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. छोटीशी चूक भारताला विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या टॉप-2मध्ये स्था मिळवण्यात अडथळा निर्माण करु शकते.
अशी असेल खेळपट्टी-
भारत आणि बांगलादेश या संघातील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळवला जाणार आहे. येथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी फायदेशीर ठरते. मात्र, या ठिकाणा धावाही खूप बनतात. श्रीलंकेच्या कुमार संगाकाराने या मैदानावर तिहेरी शतकही झळकावले होते. या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या 372 इतका आहे, पण भारतीय संघाला शाकिब अल हसन याच्यापासून वाचून रहावे लागेल. या मैदानावर 7 विकेट हॉल आपल्या नावावर केला आहे.
चट्टोग्राम येथील हवामान-
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला सामना 14 -18 डिसेंबर यादरम्यान खेळवला जाणार आहे. चट्टोग्राममध्ये या 5 दिवसात ऊन बघायला मिळेल. या पाचही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता नाही. या ठिकाणी तापमान 17 ते 28 अंश सेल्सियस इतके असणार आहे. शेवटच्या दोन दिवसीत ढग दाटून येण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचा व्यत्यय येणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘स्टार खेळाडूला कसोटीत खेळवणारंच नाहीत’, दिनेश कार्तिकचे खळबळजनक वक्तव्य
केएल राहुलकडून विराट कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव; म्हणाला की,’त्याची मानसिकता…’