श्रीलंका दाैऱ्यासाठी भारतीय संघ आज (22 जुलै) श्रीलंकेला रवाना होणार आहे. ज्यासाठी बीसीसीआयकडून 18 जुलै रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आले होते. ज्यामध्ये आपल्याला अनेक बदल पाहयला मिळाले होते. ज्यामुळे चाहत्यांना अनेक प्रश्न निर्माण झाले होेते. त्यातील मुख्य प्रश्न म्हणजे हार्दिक पांड्याला वगळून सूर्यकुमार यादवला टी20 संघाचे कर्णधारपद का देण्यात आले?
वास्तविक, सूर्यकुमार यादवला भारतीय टी20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 विश्वचषक जिंकला. हार्दिक पांड्या या स्पर्धेत भारताचा उपकर्णधार होता. यापूर्वी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले जाईल, असे मानले जात होते, मात्र मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूर्यकुमार यादववर विश्वास व्यक्त केला.
सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. अजित आगरकर म्हणाले की सूर्यकुमार यादव कर्णधारपदासाठी पात्र आहे, तो सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे, पण त्याचवेळी हार्दिक पांड्या आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. हार्दिक पांड्याने आमच्यासाठी महत्त्वाच्या खेळाडूची भूमिका बजावावी अशी आमची इच्छा आहे. पण आम्हाला याची जाणीव आहे की फिटनेस हा एक मोठा घटक आहे, हार्दिक पांड्या फिटनेसशी संबंधित समस्यांशी झुंज देत आहे. आमची नजर अशा खेळाडूंवर असते जे जवळपास संघासाठी नेहमीच उपलब्ध असतात.
श्रीलंका दाैऱ्यासाठी भारतीय टी20 संघ-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ऋतुराज गायकवाडला का वगळले?’, आगरकर म्हणतोय; आम्ही…..
‘मी नेहमीच त्याचा चाहता असेन’, टीम इंडियाच्या माजी कर्णधारासाठी शिवम दुबे स्पष्टच बोलला..
IND vs SL: हेड कोच गाैतम गंभीरची पत्रकार परिषद पाहता येणार लाइव्ह, पाहा संपूर्ण अपडेट एक क्लिकवर