---Advertisement---

आयपीएल सोडून थेट ऑस्ट्रेलियात पोहोचला बुमराह! ‘त्या’ गोलंदाजाने सर्वांनाच पाडले बुचकळ्यात

Jasprit-Bumrah
---Advertisement---

भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५ वा हंगाम खेळला जात आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची शेफिल्ड शील्ड स्पर्धा खेळली गेली. या स्पर्धेचा अंतिम सामना पर्थमध्ये ३१ मार्च रोजी खेळला गेला. अंतिम सामन्याच्या शेवटच्या म्हणजेच ५ व्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची एक झलक पाहायला मिळाली.

ऑस्ट्रेलियाची शेफिल्ड शील्ड (sheffield shield) स्पर्धेचा अंतिम सामना विक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये खेळला गेला. अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी विक्टोरिया संघाचा फिरकी गोलंदाज निक मेडिनसन (Nick Madinson) याने सामन्यात ५ षटके गोलंदाजी केली. सामन्यादरम्यान मेडिनसने असे काही केले, ज्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. मेडिनसनने या महत्वाच्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचे अनुकरण केल्याचे पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, मेडिनसनने केलेली ही नक्कल पाहून, मैदानातील त्याचे सहकारी खेळाडूही हसू लागले. एवढेच नाही समालोचकही या प्रसंगानंतर स्वतःचे हसू रोखू शकले नाहीत. व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, समालोचक म्हणत आहेत की, ‘वेल डन बुमराह’. मेडिनसनच्या या चेंडूचा रिप्ले पाहिल्यानंतर समालोचक पुन्हा एकहा हसताना दिसले.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने तर अशी प्रतिक्रिया दिली की, ‘ही जसप्रीत बुमराजची चायनीज कॉपी आहे.’ तर एकाने लिहिले की, ‘थांब आत्ताच बुमराहला तुझे नाव सांगतो.’

अंतिम सामन्यात विक्टोरिया संघाने नाणेफेक जिंकली आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने ३८६ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विक्टोरिया संघ ३०६ धावा करू शकला. त्यानंतर दुसऱ्या डावात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सच्या नुकसानावर ४०० धावा केल्या. याचसोबत शेफिल्ड शील्डचा हा अंतिम सामना अनिर्णीत राहिला. सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम व्हाइटमॅनला सामनावीर निवडले गेले. त्याने पहिल्या डावात ८५ आणि दुसऱ्या डावात १२३ धावा केल्या.

शेफिल्ट शील्डच्या या अंतिम सामन्यात बुमराहची जरी चर्चा झाली असली, तरी तो सध्या भारतात आयपीएल खेळत आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने त्याला मेगा लिलावातच्या आधी १२ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. तो सध्या संघासाठी उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

“एकेकाळी मी २०१५ विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होतो, पण नंतर सर्व बदललं”

‘जगातील सर्वात प्रतिभाशाली खेळाडूंपैकी एक’, शास्त्रींनी ‘या’ युवा भारतीय खेळाडूची थोपटली पाठ

क्या बात! आपल्याच गोलंदाजीवर झेल घेण्यासाठी लिविंगस्टोन हवेत झेपावला, फलंदाजही बघतच राहिला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---