भारतीय संघाचा (team India) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील भारताच्या खराब प्रदर्शनावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ १-२ पराभूत झाला होता, तर एकदिवसीय मालिकेत संघाने ०-३ असा निराशाजनक पराभव पत्करला होता. मोहम्मद शमी यापैकी फक्त कसोटी मालिकेत खेळला आणि यासंदर्भात आता त्याने मोठे विधान केले आहे. शमीच्या मते भारतीय संघाची गोलंदाजी उत्कृष्ट होती, पण फलंदाज अपयशी ठरले.
टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद शमी दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेविषयी व्यक्त झाला आहे. त्याच्या मते फलंदाजांमुळे भारताने कसोटी मालिका गमावली, तो म्हणाला की, “हे विसरू नका की, आमच्या गोलंदाजी विभागाने चांगले प्रदर्शन केले. गोलंदाजांनी अधिक सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केले. ही एक सकारात्मक बाब आहे, जी आम्हाला नेहमी सामन्यात कायम ठेवते.”
शमीच्या मते यावेळी संघाची फलंदाजी थोडी खराब होती, याचा परिणाम भोगावा लागला. जर पराभूत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये संघाकडे ५०-६० धावा अधिक असत्या, तर जिंकण्याची एक मोठी संधी होती. लवकरच या कमतरता दूर केल्या जातील, असे शमी पुढे बोलताना म्हणाला.
अधिक वाचा – शमीसाठी चक्क अंपायरशी भिडला कर्णधार कोहली, गोलंदाजी करताना दिली होती वॉर्निंग
दरम्यान, भारताने अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ११३ धावांनी विजय मिळवला होता, पण पुढचे दोन्ही सामने दक्षिण अफ्रिकेने जिंकले. दुसऱ्या सामन्यात अफ्रिकेला विजायासाठी २४०, तर तिसऱ्या सामन्यात विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे अफ्रिकन संघाने सहज गाठले.
व्हिडिओ पाहा – पुजाराला त्याचे वडिल एका गोष्टीपासून कायम वाचवत होते
कसोटी मालिकेतील भारताच्या फलंदाजी प्रदर्शनाचा विचार केला, तर सलामीवीर केएल राहुलने पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात १२३ धावांची मोठी खेळी केली, पण त्यानंतर ५ डावांमध्ये त्याने अवघ्या १२३ धावा केल्या. तसेच दुसरा सलामीवीर मयंक अगरवाल याने पहिल्या डावात ६० धावा केल्या, पण उरलेल्या ५ डावांपैकी एकामध्येही ३० पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. मधल्या फळीतील चेतेश्वर पुजाराने ६ डावांमध्ये १२४ आणि अजिंक्य रहाणेने ६ डावात अवघ्या १३६ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलावात ‘या’ दोन परदेशी खेळाडूंवर असेल सर्वांचीच नजर; एक आहे बीबीएलचा सर्वोत्तम खेळाडू
आयपीएलमध्ये ‘या’ ५ फलंदाजांवर लागू शकते कोटींची बोली, १० संघांमध्ये रंगणार रंजक लढत
व्हिडिओ पाहा –