सध्या T20 वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच आयसीसीने या स्पर्धेची पूर्ण तयारी केली आहे. तसेच काही नियमांमुळे ही स्पर्धा आणखी रंगतदार होणार आहे. याबरोबरच आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेचे सामने अमेरिकेत खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. तर या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत.
त्याआधी आयसीसीने आगामी विश्वचषकासाठी चार नवीन नियम लागू केले आहेत. यामध्ये कोणत्या सामन्यांना राखीव दिवस असतील हे सांगितले आहे. यामध्ये उपांत्य फेरीच्या दोन लढती व अंतिम फेरीची एक लढत यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.तसेच साखळी व सुपर आठ फेरीच्या लढतींमध्ये दुसरा डाव फलंदाजी करीत असलेल्या संघाने किमान पाच षटके खेळणे अनिवार्य असणार आहे. पाच षटकांआधी पाऊस आल्यास ती लढत पूर्ण मानली जाणार नाही.
तसेच बाद फेरीच्या लढतींसाठी दुसरा डाव फलंदाजी करीत असलेल्या संघाने किमान दहा षटके फलंदाजी करायला हवी. त्यानंतरच लढतीचा निकाल लागू शकतो. पावसामुळे त्या दिवशी खेळ होऊ शकला नाही, तर मग ही लढत राखीव दिवसामध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक षटक संपल्यानंतर 60 सेकंदात दुसरे षटक सुरू करावे लागणार आहे.
Stop clock in white-ball cricket ✅
Men’s T20WC 2024 reserve days ✅
Men’s T20WC 2026 Qualification process ✅ICYMI: All the latest updates from the ICC board meeting 👇https://t.co/IIzHxZ9WH3
— ICC (@ICC) March 16, 2024
दरम्यान, वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तरित्या स्पर्धेचं आयोजन केलं असून 1 जून ते 29 जून दरम्यान ही स्पर्धा असणार आहे. आयसीसीने या स्पर्धेची पूर्ण तयारी केली आहे. तसेच काही नियमांमुळे ही स्पर्धा आणखी रंगतदार होणार आहे. असं असताना आयसीसीने पुढच्या टी20 वर्ल्डकपची तयारी सुरु केली आहे. T20 वर्ल्डकप स्पर्धा 2026 या वर्षी असणार आहे. या स्पर्धेचं आयोजन भारत आणि श्रीलंका हे दोन देश मिळून करणार आहेत. या स्पर्धेसाठी 20 संघ कसे पात्र ठरणार याचं गणित आयसीसीने आताच ठरवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- एकदिवसीय आणि टी20 चे असे दिग्गज भारतीय फलंदाज जे कसोटीमध्ये फ्लॉप ठरले
- IPLच्या 17 व्या हंगामाआधी अंबाती रायुडूने दिली महेंद्रसिंह धोनीबाबत मोठी माहिती, म्हणाला…