मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 8 धावा केल्या आहेत. तसेच भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला आहे.
या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 204 चेंडूत 82 धावा केल्या. याबरोबरच विराटने यावर्षी परदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करण्याचा टप्पा पार केला आहे. परदेशात एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारा विराट पहिला आणि एकमेव फलंदाज आहे.
दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा आज ६३ धावांवर नाबाद राहिला. रोहितने 114 चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने हे अर्धशतक केले.
घडला खास योगायोग-
रोहित शर्माने ६व्या क्रमांकावर फलंदाजी करताना बरोबर ११४ चेंडूत या धावा केल्या. तर यापुर्वी या क्रमांकावर फलंदाजी करताना केवळ एकाच खेळाडूने ६४ धावा केल्या होत्या. तो खेळाडू होता विराट कोहली. त्याने विंडीजविरुद्ध खेळताना २०१२मध्ये असा कारनामा केला होता. विशेष म्हणजे विराटनेही या ६३ धावांसाठी ११४ चेंडूच खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
–त्या गोलंदाजाच नाव जरी घेतलं तरी कोहली, पुजारा आणि रहाणे येतात टेन्शनमध्ये
–Video: हिटमॅन रोहित शर्माने ती गोष्ट केली तर ऑस्ट्रेलियन कर्णधार होणार मुंबई इंडीयन्सचा सपोर्टर
–तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे ११ पैकी ६ खेळाडू आहेत त्रिशतकवीर