भारतीय महिला संघ विरूद्ध न्यूझीलंड महिला संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. या मालिकेत भारतीय संघाने 2-1 ने विजय मिळवला. पण न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची स्टार सलामीवीर स्म्रीती मानधनाने (Smriti Mandhana) शानदार शतक झळकावून इतिहास रचला आहे. मानधना ही भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी खेळाडू ठरली आहे.
मानधनाने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 8वे शतक झळकावून इतिहास रचला. तिने भारताची माजी दिग्गज मिताली राजचा (Mithali Raj) 7 शतकांचा रेकाॅर्ड मोडीत काढला आहे. स्म्रीती मानधनाने (Smriti Mandhana) न्यूझीलंडविरूद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात 100 धावांची खेळी केली. दरम्यान तिने 122 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकार लगावले.
स्म्रीती मानधनाचे (Smriti Mandhana) शानदार शतक आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नाबाद 59 धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 6 गडी राखून धुव्वा उडवत 3 सामन्यांची मालिका 2-1 ने खिशात घातली. न्यूझीलंडने दिलेले 233 धावांचे आव्हान भारतीय संघाने 44.2 षटकात पूर्ण केले.
भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या महिला खेळाडू-
स्म्रीती मानधना- 8 शतके (88 सामने)
मिताली राज- 7 शतके (232 सामने)
हरमनप्रीत कौर- 5 शतके (135 सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2025 लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? ‘हा’ संघ पहिल्या क्रमांकावर
IND vs NZ; ‘या’ 3 खेळाडूंच्या जागी हर्षित राणाला संघाच्या प्लेइंग 11 मध्ये मिळू शकते संधी
‘या’ स्टार खेळाडूला संघातून वगळल्यानंतर निवडकर्त्यांवर भडकले गावसकर, म्हणाले…