दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी मालिकेत आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. मोहम्मद सिराजने 6, मुकेश कुमारने 2 तर जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेत आफ्रिकेला 24 षटकांतच गारद केले. परंतू याचबरोबर टीम इंडियाने अफलातून विक्रम केला.
55 धावांमध्येच केले सर्वबाद-
भारतीय संघाने आफ्रिकेला 55 धावांवर सर्वबाद करत एक खास विक्रम रचला. 2021मध्ये भारताने वानखेडे स्टेडियम,मुंबई इथे न्यूझीलंड संघाला केवळ 62 धावांमध्ये सर्वबाद केले होते. कोणत्याही संघाची ही भारताविरुद्धची निचांकी धावसंख्या होती. त्यानंतर केवळ 3 वर्षातच भारताने आपला हा विक्रम मोडला आहे. 1932 साली आफ्रिका संघ 36 व 45 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर 92 वर्षांत त्यांच्यावर अशी वेळ कधीही आली नव्हती.
टीम इंडियाचा कसोटीतील सर्वात मोठा पराक्रम
भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये 2023मध्ये श्रीलंका संघ निचांकी धावांवर सर्वबाद झाला होता. तेव्हा लंकेने केवळ 55 धावा केल्या होत्या. 2023मध्येच टी20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघ भारताविरुद्ध निचांकी 66 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर केवळ एक वर्षात टीम इंडियाने आपलाच कसोटीतील विक्रम मोडला आहे.
फक्त 9.4 षटकांत टीम इंडियाने 56 धावा करत आफ्रिकेवर पहिल्या डावात आघाडी घेतली. 2001 नंतर पहिल्यांदाच कोणत्याही संघाने एवढी कमी षटकं खेळून विरोधी संघावर पहिल्या डावात 98 धावांची आघाडी घेतली. भारताची धावसंख्या 153 असताना संघाच्या चार खेळाडूंनी विकेट्स गमावल्या होत्या. पण संघ सर्वबाद झाला तेव्हाही संघाची धावसंख्या 153 धावाच होती. शेवटच्या सहा खेलाडूंनी अवघ्या 12 चेंडूत आणि अवघ्या 14 मिनिटांमध्ये एकही धाव न करता विकेट्स गमावल्या. कागिसो रबाडा आणि लुन्गी एनगिडी यांनी शेवटच्या षटकांमध्ये प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.
केपटाऊन कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर (कर्णधार), एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
महत्वाच्या बातम्या –
असं कसं झालं..! सॅल्यूट ठोकावी अशी कामगिरी केलेल्या टीम इंडियाने कसोटी इतिहासातला लाजीरवाणा विक्रमही केला नावावर
संपुर्ण वेळापत्रक: प्रत्यक्ष मैदानात जाऊन मॅचेस पाहण्याची संधी, 2024मध्ये ‘इंडिया’ खेळणार तुफान सामने