मंगळवारी (12 सप्टेंबर) भारतीय संघ यजमान श्रीलंका संघापुढे अगदीच दुपळा वाटला. आशिया चषक 2023चे सुपर फोर सामने खेळले जात असून भारत आणि श्रीलंका आमने सामने होते. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताण्याचा निर्णय घेतला. पण श्रीलंकन संघाच्या गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. अवघ्या 213 धावा करून भारताने 49.1 षटकात सर्व विकेट्स गमावल्या.
भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. यासाठी त्याने 43 चेंडू खेळून 7 चौकार आणि 2 षटकार मारले. सलामीवीर शुबमन गिल याने 25 चेंडूत 19 धावा करून विकेट गमावली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला विराट कोहली 12 चेंडूत अवघ्या 3 धावा करून तंबूत परतला. चौथ्या क्रमांकावर ईशान किशन आला आणि 33 धावांचे योगदान देऊ शकला. मागच्या सामन्यात शतक केल्यानंतर राहुल याही सामन्यात चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, वैयक्तिक 39 धावांची खेळी करून त्यानेही विकेट गमावली. हार्दिक पंड्या याने 5, तर रविंद्र जडेजा याने 4 धावांवर विकेट्स गमावल्या. अक्षर पटेल य़ाने 28 चेंडूत 14 धावा केल्या. जसप्रीत बुमराह याने 5, तर कुलदीप यादव शुन्यावर बाद झाला.
श्रीलंकेसाठी फिरकीपटू दुनिथ वेललागे (Dunith Wellalage) याने 10 षटकांमध्ये 40 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या होत्या. फिरकीपटू धनंजया डी सिल्वा (Dhananjaya de Silva) यानेही 9 षटकांमध्ये 4 विकेट्स घेतल्या. (In the match against Sri Lanka, the entire Indian team, except captain Rohit Sharma, was wrapped up cheaply)
सुपर-4मधील चौथ्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
श्रीलंका संघ- पथूम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लागे, महीश थीक्षणा, कसुन रजिथा, मथीशा पथिराना
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
भारताकडून पराभव मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बाबर आझमचा सन्मान! तिसऱ्यांदा केली ‘ही’ कामगिरी
बिग ब्रेकिंग! षटकार खेचत रोहित बनला वनडेतील 10 हजारी मनसबदार, सचिनचा विक्रम मोडला