रिषभ पंतने यंदाच्या टी20 विश्वचषकात दुखापतीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये जोरदार कमबॅक केला आहे. आतापर्यंत विश्वचषकात रिषभ पंत चांगल्या फाॅर्म मध्ये दिसला आहे. त्याने भारतीय संघासाठी पाकिस्तान विरुद्ध महत्वाची खेेळी खेळली होती. कार अपघातामुळे रिषभ 15 महिन्यापासून संघातून बाहेर होता. पण टी20 विश्वचषकासाठी रोहित बीसीसीआयने त्याच्यावर विश्वास दाखवत संघात स्थान दिले, त्याच विश्वासाला पात्र ठरत रिषभ पंतने शानदार कामगिरी केला आहे. आता, 2024 च्या टी20 विश्वचषकादरम्यान, पंतने आपली सर्व कमाई दान करण्याबद्दल बोलले आहे. तर पंतने असे का म्हणाले ते जाणून घेऊया.
रिषभ पंतने 18 मे 2024 रोजी त्याचे यूट्यूब चॅनल उघडले होते. ज्यावर त्याने आतापर्यंत सात व्हिडिओ अपलोड केले आहेत. पंतने एक लाख सबस्क्राइबर्स पूर्ण केले आहेत, त्यामुळे यूट्यूबने त्याला सिल्व्हर प्ले बटण पाठवले आहे. पंतने यूट्यूब कम्युनिटी पोस्टमध्ये सिल्व्हर प्ले बटणासह एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की तो यूट्यूब मधील सर्व कमाई, त्याच्या स्वत: च्या कमाईतील काही योगदानासह, एका चांगल्या कारणासाठी दान करेल. म्हणजे युट्युब चॅनलवरून पंत जे काही कमावेल ते दान करणार आहे.
Rishabh Pant will donate all the earnings from YouTube for a good cause. 👌
– A lovely gesture by Pant. pic.twitter.com/08Z9f92yUB
— Johns. (@CricCrazyJohns) June 15, 2024
पंतने पोस्टमध्ये लिहिले की, “हे सिल्व्हर प्ले बटण आपल्या सर्वांचे आहे. आम्ही एक लाखापर्यंत पोहोचलो आहोत आणि आणखी लोक सामील होत आहेत. हा टप्पा चिन्हांकित करण्यासाठी, मी माझ्या स्वतःच्या कमाईतील काही योगदानासह सर्व यूट्यूब कमाई चांगल्यासाठी दान करत आहे, चांगल्या कारणासाठी देणगी देण्यास वचनबद्ध आहे. या प्लॅटफॉर्मचा उपयोग सुधारण्यासाठी आणि बदलासाठी करुया.”
महत्तवच्या बातम्या-
“उमर अकमलचे आकडे विराट कोहलीपेक्षा चांगले आहेत”, पाकिस्तानच्या माजी फलंदाजानं तोडले अकलेचे तार
सुपर-8 मध्ये पोहचताच अफगाणिस्तानला धक्का, संघाचा स्टार फिरकीपटू दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर
“कुर्बानी के जानवर हाजिर हो”, बाबर आझमवर भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; सोशल मीडियावर काढला राग