भारत आणि दक्षिण अफ्रिका (sa vs ind test series) यांच्यातील तिसरा कसोटी सामना ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली (virat kohli) दुखापतीमुळे सहभाग घेऊ शकला नव्हता. चाहत्यांमध्ये विराट तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत संभ्रम होता. परंतु, विराटने तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी चाहत्यांच्या मनातील शंकेचे निसरन केले आहे. यावेळी त्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या (mohammad siraj) फिटनेसविषयी देखील महत्वाची माहिती दिली.
केपटाऊमधील कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी विराटने सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यात त्याने अनेक मुद्यांवर स्पष्टीकरण दिले. कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला विराट कोहली अनुपस्थित होता. परंतु, मालिकेती तिसऱ्या सामन्यात तो संघात पुनरागमन करणार आहे. पत्रकार परिषदेत बोलताना विराटने सुरूवातीलाच सांगितले की, “मी पूर्णतः फीट असून मैदानावर खेळण्यास सक्षम आहे.” दरम्यान, दुसऱ्या कसोटीत विराटच्या अनुपस्थिती केएल राहुलने संघाचे नेतृत्व केले, तसेच जसप्रीत बुमराहने उपकर्णधाराची भूमिका पार पाडली.
सिराजच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज जोहान्सबर्गमधील कसोटी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. अशात तिसऱ्या कसोटी सामन्यात सिराजच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना विराट कोहलीने मोहम्मद सिराजबाबत महत्वाची माहिती दिली. “सिराज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी अद्याप पूर्णतः तयार नाही” असे विराट कोहली म्हटला.
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सध्या खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने एका सामन्यात विजय, तर एकामध्ये पराभव पत्करला आहे. माहिलेतील पहिला सामना सेंचुरियनमध्ये खेळला गेला. सेंचुरियनमधील या सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी मोठा विजय मिळवला होता आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर उभय संघातील दुसरा सामना जोहान्सबर्गमध्ये खेळला गेला. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारतीय संघाला मात दिली आणि सात विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानतंर अफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मालिका जिंकण्याच्या दृष्टीने दोन्ही संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असतील.
महत्वाच्या बातम्या –
विजयी भव! केपटाऊन कसोटीत कर्णधार विराटची बॅट ओकणार आग, विजयासाठी टीम इंडियाची तयारी सुरू
प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला मोठा दिलासा, ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील केस जिंकली
विराटच्या पुनरागमनामुळे कोणाला बाकावर बसवणार? अंतिम कसोटीसाठी अशी असेल ‘भारताची प्लेइंग इलेव्हन’
व्हिडिओ पाहा –