यावेळी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2022 दिग्गज संघांचा घाम काढणारी सिद्ध झाली. तेच दुसऱ्या काही संघांसाठी आयपीएल एकदम चमकदार विजय मिळवून देणारी संधी सिद्ध झाली आहे. सर्वात जास्त म्हणजे 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकलेल्या टी20 लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ होता मुंबई इंडियन्स. यावेळी 50 सामन्यांनंतरही या संघाला सूर सापडला नाही. हा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर फेकला जाणारा पहिला संघ बनला.
डिफेंडिंग चॅम्पयन आणि 4 वेळा विजेता झालेला चेन्नई सुपर किंग्सही जवळपास आता बाहेर पडली आहे. तेच, दोनदा आयपीएलचा किताब जिंकलेली केकेआरही आता खराब स्थितीत आहे.
बाकी सर्व संघांना मागे टाकत चार संघ समोर आले आहेत. यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals), सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad), लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) समावेश आहे. यांच्या विकेट्सबाबत बोलायचं, तर राजस्थान रॉयल्सने आजवर 69, सनरायझर्स हैदराबादने 62, लखनऊ सुपरजायंट्सने 61 आणि गुजरात टायटन्सने 60 विकेट्स आपापल्या खात्यात टाकले आहेत.
स्वदेशी मायक्रो-ब्लॉगिंग मंच, ‘कू’वर काही दिवसांपासून याच चार संघांची जादू चालते आहे. भारतीय क्रिकेटर्स आणि त्यांचे चाहते लोक या चारही संघांचं भरभरून कौतुक करत आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय क्रिकेटर अभिनव चारही टीम्सचे कौतुक करताना म्हणतात, “तुफान प्रभावी गोलंदाजी करणारे संघच या हंगामात श्रेष्ठ बनून समोर आले आहेत. पॉवरप्ले आणि दरम्यानच्या ओव्हर्समध्ये विकेट घेणे केवळ गोलंदाजी करण्याहून जास्त महत्त्वाचे आहे. स्टँडिंगमध्ये टॉप चार संघांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. यातून कळते की, #MI सारखे सुपर संघ सध्या का संघर्ष करत आहेत.”
तर, भारतीय महिला क्रिकेटर हरलीन कौर देओल यांनी विजयाचे श्रेय कर्णधाराला दिले. त्या म्हणतात, “एका कर्णधाराला आपल्या टीम इतकेच विजयाचे श्रेय जाते. कर्णधार एक अशी कुशल व्यक्ती असते, जी एकाच संघात गोलंदाज आणि फलंदाज यांचा योग्य समन्वय करते. ज्या कर्णधाराला हे चांगले जमते, त्याच्याच संघाने आयपएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. #IPL2022 #CricketOnKoo.”
भारतीय महिला क्रिकेटर निकिता भुवा यांनी गोलंदाजांचे कौतुक करताना म्हटले, “#IPL_2022 वर आतापर्यंत गोलंदाजांनी आपला ठसा उमटवला. या हंगामाच्या आईपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा संघ अव्वल स्थानावर आहे. यातून आयपीएलमध्ये खेळाचा दर्जाही सुधारला आहे. #CricketOnKoo #IPL2022.”
क्रिकेटचे एक फॅन जोहन्स बॅनी कू करताना म्हणतात, “आयपीएल 2022 मध्ये सर्वात जास्त बळी घेणारा आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू एकाच संघातला आहे. #IPL2022 #CricketOnKoo.”
आता पाहायचं हे आहे, की 15व्या हंगामात कुठला संघ बाजी मारतो. गोलंदाजांना समर्पित या हंगामाचा चषक कुणाकडे जातो याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी म्हतारा होतोय’, सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर असं का म्हणाला वॉर्नर, वाचा सविस्तर






