भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आमने सामने आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी (9 डिसेंबर) हा सामना आयोजित केला गेला. नाणेफेक जिंकून इंग्लंडची कर्णधार हेदर नाईट हिने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने भारताला 38 धावांनी मात दिली होती. या विजयानंतर इंग्लंड 0-1 अशा आघाडीवर आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा निकाल निर्णायक ठरू शकतो. इंग्लंडने हा सामना जिंकला, तर यजमान भारताला मालिका पराभवाला सामोरे जावे लागेल. तर दुसरीकडे इंग्लंड पराभूत झाला, तर मालिका 1-1 अशा बरोबरीवर सुटेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), श्रेयंका पाटील, तीतस साधू, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, सायका इशाक.
इंग्लंड – सोफिया डंकले, डॅनी व्याट, ऍलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हेदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (डब्ल्यूके), फ्रेया कॅम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, चार्ली डीन, लॉरेन बेल.
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
WPL 2024: लिलावातील अशा 5 खेळाडू, ज्यांना मिळाली 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम; भारताच्या 2 रणरागिणींचाही समावेश
WPL 2024 Auction: फॅन CSKची, पण खेळणार RCBकडून, ‘एवढ्या’ लाखात बनली संघाचा भाग