भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने वर्चस्व गाजवले. भारताने 2-0 ने आघाडी मिळवत बांगलादेशला क्लीन स्वीप केले. चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला, तर कानपूर कसोटीत 7 गडी राखून विजय मिळवला. पण भारताने कानपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत एक आश्चर्यकारक रेकार्ड आपल्या नावावर केला.
भारतीय संघ आता जगातील पहिला असा संघ बनला आहे. ज्यांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकही मेडन ओव्हर न खेळता सामना जिंकला. क्रिकेटमध्ये याआधीही असे घडले आहे, जेव्हा एखाद्या संघाने मेडन ओव्हर न खेळता सामना जिंकण्याचा रेकाॅर्ड केला होता. 1939 मध्ये डर्बन येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात हा पराक्रम घडला होता. इंग्लंडने पहिल्या डावात 469 धावा केल्या दरम्यान त्यांनी दक्षिण आफ्रिकेला एकही मेडन षटक टाकू दिले नाही. इंग्लंडने हा सामना डाव आणि 13 धावांच्या फरकाने जिंकला होता. पण त्या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात फलंदाजी केली नव्हती.
त्यामुळे दोन्ही डावात एकही मेडन ओव्हर न खेळता कसोटी सामना जिंकणारा भारत आता पहिला देश ठरला आहे. बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपला. सामन्याचे पहिले तीन दिवस पावसाने वाया गेल्यामुळे भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी करत 34.4 षटकात 285 धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताला 95 धावांचे लक्ष्य मिळाले, जे भारताने अवघ्या 17.2 षटकांत पूर्ण केले. अशाप्रकारे भारताने संपूर्ण सामन्यात केवळ 52 षटके खेळली आणि एकूण 383 धावा केल्या. बांगलादेशने 52 षटके टाकली, पण त्यांच्या गोलंदाजांना एकही मेडन षटक टाकता आले नाही.
भारताच्या आगामी कसोटी मालिकेला 16 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. ही मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळली जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतासाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“भारतासाठी खेळताना…” टी20 विश्वचषकापूर्वी स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य
पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू मैदानावर खरंच करतो दुखापतीचं नाटक?
बुमराह नंबर 1 टेस्ट बॉलर, तर अश्विनची घसरण; विराटनंही घेतली मोठी झेप!