टी-२० विश्वचषकानंतर १७ नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही संघांचे खेळाडू मागच्या बऱ्याच काळापासून कोरोनामुळे संघाच्या बायो बबलमध्ये आहेत आणि बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क झालेला नाही. अशात टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडचे नेतृत्व करणाऱ्या टिम साउदीने या मालिकेपूर्वी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते बायो बबलमुळे खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. अशा वातावरणात खेळाडूंना जास्त काळ राहावे लागणार नाही अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे
न्यूझीलंड संघाचा नियमित कर्णधार केन विलियम्सनला टी-२० मालिकेदरम्यान विश्रांती दिली गेली आहे. साउदीही मागच्या बऱ्याच दिवसांपासून बायो बबलमध्ये आहे. असे असले तरी, तो भारताविरुद्ध टी-२० आणि कसोटी या दान्ही मालिकांमध्ये सहभागी असणार आहे. तो आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यापासून बायो बबलमध्ये आहे. त्याच्या मते या गोष्टीचा खेळाडूंवर प्रभाव पडतो.
तो म्हणाला, “मागच्या दोन वर्षात जगभरात जे काही झाले, त्यामुळे बायो बबल आणि विलगीकरणासोबत गोष्टी खूप अवघड झाल्या आहेत आणि काही काळानंतर याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.”
साउदी यावेळी बोलताना म्हणाला की, “आम्हाला नाही माहीत की, भविष्यात काय होणार आहे? आम्हाला बायो बबलमध्ये राहुन खेळणे कायम ठेवावे लागणार आहे की नाही? आणि मला वाटते की विलगीकरणामुळे तुमच्यावर अधिक दबाव बनतो. हे असे काही आहे, ज्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. आपल्याला याची सवय लावून त्याच्या अनुकूल बनले पाहिजे. पण याचा परिणाम जाणवतोच. मी काही अशा खेळाडूंना ओळखतो, जे मोठ्या काळासाठी बायो बबलमध्ये राहीले आणि काही काळानंतर त्यांच्यावर त्याचा प्रभाव पडला आहे. अपेक्षा आहे की, आम्हाला जास्त काळासाठी बायो बबलमध्ये राहण्याची गरज पडू नये.”
तसेच संघाच्या रणनितीविषयी बोलताना साउदी म्हणाला की, “हे काहीसे असे आहे, ज्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. पाच दिवसांमध्ये ३ सामने खेळायचे आणि यादरम्यान प्रवास करायचा आणि पुन्हा दोन दिवासांनी कसोटी मालिका खेळायची. पूर्ण दौऱ्यात खेळाडूंच्या कामाच्या ताणावर लक्ष ठेवले जाईल. आमच्याकडे १५ खेळाडू आहेत, जे विश्वचषकात संघात सामील होते आणि मला वाटते की त्यांचाही मालिकेत उपयोग केला जाईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक संपताच पाकिस्तानच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचा कसोटी क्रिकेटला अलविदा
ऑस्ट्रेलियाने वॉनची ‘ती’ भविष्यवाणी ठरवली खोटी, गोलंदाज झम्पाने भन्नाट पोस्ट करत लगावली चपराक