भारतीय महिला संघाला रविवारी (10 डिसेंबर) इंग्लंड संघाविरुद्ध 5 विकेट्स राखून विजय मिळाला. टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताला मिळालेला पराभव चाहत्यांची निराशा करणारा होता. पण तिसऱ्या सामन्यात संघाला अखेर विजय मिळाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघ 5 विकेट्स राखून जिंकला. या विजयात स्मृती मंधाना हिने सर्वाधिक धावांचे योगदान दिले.
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार हेदर नाईट हिचे अर्धशतक इंग्लंडसाठी महत्वाचे ठरले. पण संघातील इतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकली नाही. इंग्लंडने निर्धारीत 20 षटकांमध्ये 126 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. एमी जोन्स हिने 25 धावांचे योगदान दिले. भारतासाठी नवख्या श्रेयांका पाटील आणि सायका इशाक यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. रेणुका सिंग आणि अमनजोत कौर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात भारतीय संघ फलंदाजीला आल्यानंतर सलामीवीर स्मृती मंधाना हिने 5 चाकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 धावांची सुरेख खेळी केली. सलामीवीर शेफाली वर्मा हिने अवघ्या 6 धावांवर विकेट गमावली. जेमिमाह रॉड्रिग्ज हिने 29 धावांचे योगदान दिले. दीप्ती शर्मा हिने 12 धावा करून विकेट गमावली. कर्णधार हरमनप्रीत 6*, तर अमनजोत कौर हिने 13 धावा करून विकेट गमावली. इंग्लंडसाठी फ्रेय केम्प आणि सोफी एक्लेस्टोन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. चार्ली डीन हिनेही एक विकेट घेतली. श्रेयांका पाटील हिला सामनावीर पुरस्कार मिळाला. तर नेट सायव्हर ब्रंट हिला मालिकावीर म्हणून निवडले गेले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), श्रेयंका पाटील, तीतस साधू, अमनजोत कौर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक.
इंग्लंड – सोफिया डंकले, माइया बाउचियर, ऍलिस कॅप्सी, हेदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), डॅनियल गिब्सन, बेस हीथ, फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, माहिका गौर.
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर लीग 2023मध्ये जीएम टायफुन्स, रॉयल स्टॅलियन्स संघांचा दुसरा विजय
डेव्हिड वॉर्नरचं मिचेल जॉन्सनला चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझ्या आई-वडिलांनी माझे…’