भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजी करावी लागली. मॅथ्यू वेड याने प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय सुरुवातीला योग्य वाटत होता. पण ऋतुराज गायकवाड याचे वादळ ऑस्ट्रेलियन गोलंदाज रोखू शकले नाहीत. परिणामी भारताने 20 षटकांच्या या सामन्यात 222 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघ मैदानात आल्यानंतर यशस्वी जयस्वाल मोठी खेळी करू शकला नाही. सलामीवीर फलंदाज 6 चेंडूत अवघ्या 6 धावा करून बाद झाला. ईशान किशन यानेही 5 चेंडू खेळून शुन्य धावांवर विकेट गमावली. सूर्यकुमार यादव 29 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. सलामीला आलेला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) संघासाठी मोठी खेळी करू शकला. त्याने 52 चेंडूत आपेल शतक पूर्ण केले. एकूण 56 चेंडू खेळल्यानंतर ऋतुराजने 123 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याचा स्टाईक रेट 215.78 राहिली. तिलक वर्मा याने 24 चेंडूत 31* धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात केन रिचर्डसन, जेसन बेहरनडॉर्फ आणि आरोन हार्डी यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. संघासाठी धावा खर्च करण्याच्या बाबतीत सर्वाधित महागात पडला आरोन हार्डी. हार्डीने चार षटकांमध्ये 64 धावा खर्च करून एक विकेट घेतली. (In the third T20 match against Australia, India set a target of 223 runs to Australia)
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन – ट्रॅव्हिस हेड, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड(कर्णधार), नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन
भारत प्लेईंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
गंभीरने निवडली वर्ल्डकमधील सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन; संघात चार भारतीय घेतले, पण…
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 20 देशांतील खेळाडू झुंजणार