भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka t20 series) यांच्यातील भारतात जाणाऱ्या टी-२० मालिकेची सुरुवात २४ फेब्रुवारीला होणार आहे. नुकत्याच खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत भारताने सोपा विजय मिळवला. श्रीलंकेविरुद्धही अशाच प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा युवा खेळाडूंना संधी देताना दिसणार आहे. तसेच स्वतः रोहितसाठीही ही आगामी मालिका खास ठरणार आहे. फलंदाजाच्या रूपात रोहितच्या नावावर मोठ्या विक्रमांची नोंद होऊ शकते.
कर्णधार रोहित शर्मा या आगामी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध सर्वात जास्त टी-२० धावा करणारा भारतीय फलंदाज बनू शकतो. रोहितने श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत २८९ टी-२० धावा केल्या आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर शिखर धवन आहे आणि रोहित त्याच्यापेक्षा ८६ धावांनी मागे आहे. जर रोहितने या मालिकेत ८६ धावा केल्या, तर तो श्रीलंकेविरुद्ध सर्वात जास्त टी-२० धावा करणारा भारतीय खेळाडू बनू शकतो.
असे असले तरी, धवनला मागे टाकण्याआधी रोहितला केएल राहुल (२९५) आणि विराट कोहली (३३९) यांना देखील मागे टाकावे लागणार आहे. धवन, राहुल आणि विराट श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत विश्रांतीवर आहेत, त्यामुळे रोहितकडे हा मोठा विक्रम करण्याची संधी तयार झाली आहे.
टी२०मध्ये षटकारांचाही किंग बनू शकतो रोहित
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्माकडे दुसरा मोठा विक्रम करण्याची देखील संधी आहे, तो म्हणजे रोहित आता सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय टी-२० षटकार मारणारा फलंदाज बनू शकतो. रोहितने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १५४ षटकार मारले आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मार्टिन गप्टिलपेक्षा तो फक्त ११ षटकारांनी मागे आहे. म्हणजेच आगामी मालिकेत त्याने जर १२ षटकार मारले, तर तो या यादीत पहिल्या क्रमांकावार पोहोचू शकतो.
रोहित शर्मा फक्त षटकारच नाही, तर सर्वात जास्त टी-२० धावा करण्याच्या बाबतीत देखील पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३२६३ धावा केल्या आहेत. त्याने जर अजून ३७ धावा केल्या, तर तो पहिल्या क्रमांकावरील मार्टिन गप्टिलला मागे टाकून यादीत पहिले स्थान मिळवू शकतो. गप्टिलच्या नावावर ३२९९ टी-२० धावा आहेत.
तसे पाहिले तर श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्माचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. टी-२० मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध २२.२३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. दोन वेळा तो या संघाविरुद्ध खेळताना शून्य धावांवर बाद झाला आहे. असे असले तरी, त्याने अलिकडच्या काळात श्रीलंकेविरुद्धच एक शतक ठोकले आहे.
महत्वाच्या बातम्या –
…आणि सर्वात मोठ्या रनचेजमध्ये अर्धवट नशेत गिब्जने केली वादळी खेळी