क्रिकेट जगातामध्ये 2020 हे वर्षे विश्वचषकाचे वर्ष असणार आहे. कारण यावर्षी तब्बल तीन विश्वचषक चाहत्यांना पहायला मिळणार आहेत. यामध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक, टी20 महिला विश्वचषक आणि टी20 पुरुष विश्वचषक या विश्वचषक स्पर्धा होणार आहेत.
19 वर्षांखालील विश्वचषक(U19 World cup) –
2020च्या सुरुवातीलाच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार आहेत. या विश्वचषकाला 17 जानेवारीपासून सुरुवात होणार असून 9 फेब्रुवारीला अंतिम सामना रंगेल. या विश्वचषकात भारतासह एकूण 16 देश सहभागी होणार आहेत.
भारताचा(India) या विश्वचषकाच्या साखळी फेरीसाठी न्यूझीलंड, श्रीलंका आणि जपानसह अ गटात समावेश आहे. भारताचा पहिला सामना 19 जानेवारीला श्रीलंकाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ जपान विरुद्ध 21 जानेवारीला आणि न्यूझीलंड विरुद्ध 24 जानेवारी साखळी फेरीचे सामने खेळेल.
टी20 महिला विश्वचषक(T20 Women’s World cup) –
19 वर्षांखालील विश्वचषकानंतर लगेचच फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियात आयसीसी महिला टी20 विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकाला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी अंतिम सामना होणार आहे.
या विश्वचषकासाठी गतविजेता ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, बांगलादेश आणि थायलंड संघांचा समावेश आहे. भारताचा या विश्वचषकाच्या साखळी फेरीसाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेशसह अ गटात समावेश आहे.
या स्पर्धेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील सामन्याने सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय महिला संघ साखळी फेरीत बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध अनुक्रमे 24 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारीला सामने खेळेल.
टी20 पुरुष विश्वचषक(T20 Men’s World cup) –
पुढीलवर्षी 18 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये पुरुषांच्या टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. पुरुषांच्या या टी20 विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज हे 10 संघ मुख्य विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत.
तसेच पपुआ न्यू गिनी, आयर्लंड, नामीबिया, नेदरलँड्स, ओमान आणि स्कॉटलँड या अन्य 6 संघांनी टी20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत प्रवेश केला आहे. 2020 टी20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 15 नोव्हेंबरला होणार आहे.
…म्हणून डेल स्टेनने भारतीय चाहत्याला सुनावले खडेबोल
वाचा- ????https://t.co/0qCt9LQAAv????#Cricket #TeamIndia #वर्ष2019 @DaleSteyn62— Maha Sports (@Maha_Sports) December 31, 2019
२०१९मध्ये वनडेत धावांचा रतिब घालणारे ५ फलंदाज
वाचा- ????https://t.co/XLdQijEdcd????#Cricket #TeamIndia #म #मराठी #वर्ष2019— Maha Sports (@Maha_Sports) December 31, 2019






