क्रिकेट म्हणजे चाहत्यांचा सर्वात आवडीचा विषय. अनेकदा जागतिक क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघ जेव्हा आमने-सामने असतात, तेव्हा तो सामना पाहणे ही एक पर्वणीच असते. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी तर चाहते सर्व मर्यादा ओलांडतात. मात्र, भारताचाच शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये असे खूप कमी वेळा पाहायला मिळते. असे असले, तरीही जेव्हा गोष्ट आपल्या संघाला पाठिंबा देण्याची येते, तेव्हा नेपाळचे क्रिकेट प्रेमीही कुणाच्याही मागे राहत नाहीत. असाच काहीसा शानदार नजारा गुरुवारी (दि. 16 मार्च) काठमांडूच्या कीर्तीपूर येथील त्रिभूवन युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल क्रिकेट ग्राऊंडमध्ये पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, असा क्षण इथे खूप कमी वेळा पाहायला मिळतो.
या मैदानावर यजमान नेपाळ विरुद्ध यूएई असा सामना खेळला गेला. या सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी स्टेडिअममध्ये चाहत्यांनी तुफान गर्दी केली. एवढेच नाही, तर जेव्हा संपूर्ण स्टेडिअममध्ये पाय ठेवायला जागा उरली नाही, तेव्हा हा सामना पाहण्यासाठी चाहते थेट झाडावर चढले. चाहत्यांची क्रिकेटविषयीचं हे प्रेम पाहून नेपाळ क्रिकेट असोसिएशनही हैराण झाले. नेपाळ क्रिकेटने या सामन्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये चाहते हजारोंच्या संख्येने दिसत आहेत.
Nepali supporters showed remarkable devotion and passion for their team at TU International Cricket Ground. Their unwavering commitment to Nepali cricket was evident through thunderous cheers, flag-waving, and emotional outbursts. JAI NEPAL🇳🇵🇳🇵#CWCL2 #NEPvUAE #weCAN pic.twitter.com/TSmZalPJR3
— CAN (@CricketNep) March 16, 2023
Incredible Scene as Thousands of Fans came to witness the Epic Showdown Between Nepal and UAE at TU International Cricket Ground. Check out these Stunning Pictures of a Housefull Crowd Cheering on their Teams!
#CWCL2 #NEPvUAE #weCAN pic.twitter.com/lGu150vOlz
— CAN (@CricketNep) March 16, 2023
सामन्याचा आढावा
सामन्याबाबत बोलायचं झालं, तर यूएईने आसिफ खान याच्या वादळी शतकाच्या जोरावर 50 षटकात 6 विकेट्स गमावत 310 धावांचे भले-मोठे आव्हान उभे केले होते. आसिफने या सामन्यात फक्त 41 चेंडूत शतक ठोकत वनडे क्रिकेटच्या इतिहासातील चौथे सर्वात वेगवान शतक केले. त्याने 11 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 41 चेंडूत 101 धावांची तडाखेबंद खेळी केली.
त्यानंतर नेपाळ संघ 311 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. यावेळी नेपाळने 44 षटकात 6 विकेट्स गमावत 269 धावा केल्या. मात्र, खराब सूर्यप्रकाशामुळे सामना मध्येच थांबवण्यात आला. त्यानंतर सामना सुरू होऊ शकला नाही. अशात डकवर्थ-लुईस नियमानुसार नेपाळ संघाने हा सामना 9 धावांनी खिशात घातला. या विजयासोबतच नेपाळने आयसीसी विश्वचषकाच्या पात्रता फेरीमधील आपले स्थानही पक्के केले आहे. (incredible scene as thousands of fans came to witness the epic showdown between nepal and uae 2023 know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जीवघेण्या कॅन्सरला मात देणाऱ्या युवराजने घेतली रिषभची भेट, विस्फोटक पंतला हिम्मत देत म्हणाला…
पंचगिरी करून एका दिवसात लाखो कमावणाऱ्या दिग्गज अंपायरचा राजीनामा, 19 वर्षांच्या कारकीर्दीची झाली अखेर