अफगाणिस्तानकडून 20 धावांनी पराभूत झाल्याने भारतीय संघ इमर्जिंग आशिया कपमधून बाहेर पडला. या उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्या डावात खेळताना 206 धावांची मोठी मजल माली होती. मात्र प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 186 धावाच करू शकला. रमणदीप सिंगने शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके मारत 64 धावांची तुफानी खेळी खेळली. पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जे की त्यांच्यासाठी योग्य ठरला. झुबैद अकबरी आणि सेदिकुल्लाह अटल यांनी 137 धावांची सलामीची भागीदारी केली. अकबरीने 64 धावा, तर अटलने 83 धावांची जलद खेळी करत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. उरलेले काम शेवटच्या ओव्हर्समध्ये आलेल्या करीम जन्नतने पूर्ण केले. त्याने 20 चेंडूत 41 धावांची तुफानी इनिंग खेळून अफगाणिस्तानची धावसंख्या 200 च्या पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. कारण अभिषेक शर्मा अवघ्या 7 धावा करून बाद झाला. प्रभसिमरन सिंग 19 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार तिलक वर्माही स्वस्तात बाद झाला. अवघ्या 48 धावांत तीन विकेट्स पडल्या होत्या. आयुष बदोनी आणि निहाल वढेरा यांनी काही वेळ डाव सांभाळला. बडोनीने 31 तर वढेराने 20 धावा केल्या. पण ते सामना जिंकवू शकले नाहीत.
एकवेळ परिस्थिती अशी होती की भारताला विजयासाठी शेवटच्या 5 षटकात 85 धावा करायच्या होत्या. अशा परिस्थितीत रमणदीप सिंग आशेचा किरण बनून क्रीजवर उभा होता. रमणदीपने येथून चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात केली आणि 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत तो झुंजत राहिला. मात्र त्याची 34 चेंडूत 64 धावांची खेळी भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली.
हेही वाचा-
IND v AUS: या स्टार खेळाडूंसाठी भारतीय संघाचे दार कायमचे बंद?
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ऋतुराज गायकवाड पुन्हा दुर्लक्षीत
BGT 2024-25; बाॅर्डर गावसकर ट्राॅफीसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ युवा खेळाडूला संधी