वेस्ट इंडीजमध्ये १४ जानेवारीपासून १९ वर्षाखालील विश्वचषकाला (u19 world cup 2021) सुरुवात झाली. शनिवारी (१५ जानेवारी) भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सामना खेळला आणि स्पर्धेतील अभियानाची सुरुवात केली. विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताच्या १९ वर्षाखालील संघाने ४५ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने सामन्यात शेवटपर्यंत विरोधी संघावर दबाव कायम ठेवला. भारतीय कर्णधार यश धूल (Yash Dhull) याने महत्वाची खेळी केली.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४६.५ षटकांमध्ये २३२ धावांचे लक्ष्य उभे केले आणि संघ सर्वबाद झाला. कर्णधार यश धूलचे यामध्ये महत्वाचे योगदान राहिले. भारताचे सलामीवीर फलंदाज अंगक्रिस रघुवंशी (५) आणि हरनुर सिंग (१) यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. परंतु त्यानंतर धूल आणि शेख रशीदने तिसऱ्या विकेटसाठी ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. कर्णधार धूल १०० चेंडूंचा सामना करताना ८२ धावांवर बाद झाला. त्यानंतर रशीद ३१ धावांवर बाद झाला. तसेच निशांत सिंधूच्या (२७) रूपात दक्षिण अफ्रिकेला त्यांची चौथी विकेट मिळाली. याव्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज चांगली खेळी करू शकला नाही.
व्हिडिओ पाहा- कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही… बोलतोय ‘किंग कोहली’
भारताला विजय मिळवून देण्यासाठी गोलंदाजांचे प्रदर्शन महत्वाचे ठरले. विक्की ओस्तवालने टाकलेल्या १० षटकांमध्ये अवघ्या २८ धावा खर्च केल्या आणि दक्षिण अफ्रिकेच्या ५ खेळाडूंना पव्हेलियनचा मार्ग दाखवला. त्याशिवाय राजा बावाने देखील महत्वाच्या चार विकेट्स घेतल्या. त्याने या सामन्यात टाकलेल्या ६.४ षटकांमध्ये ४७ धावा खर्च केल्या आणि चार विकेट्स नावावर केल्या.
दक्षिण अफ्रिका संघासाठी त्यांचा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस याने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. यश धूलने ब्रेविसचा झेल घेऊन त्याला तंबूत पाठवण्याचे काम केले. तसेच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार जॉर्ज हर्डनने ३६ तर सलामीवीर वॅलिंटिन किटिमेने २५ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज माफक धावा करू शकले नाहीत. परिणामी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे दक्षिण अफ्रिका संघ लक्ष्य न गाठता १८७ धावांवर सर्वबाद झाला.
महत्वाच्या बातम्या –
‘त्या’ एका ट्वीटमुळे बदललं सर्वकाही, विराटनंतर आता भारतीय क्रिकेटमध्ये सुरू होणार रोहितपर्व!
कोणाच्या डोक्यावर सजणार कसोटी संघाच्या नेतृत्वाचा काटेरी मुकुट? रोहित, राहुल की अन्य कोण?
व्हिडिओ पाहा –