India vs Afghanistan : भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिल्या टी-20 सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी केलेल्या अफगाणिस्तानच्या धावसंख्येचा टीम इंडियाने 6 विकेट्स राखत पाठलाग केला. या सामन्यात शिवम दुबे आणि जितेश शर्माने चांगली कामगिरी केली. याचबरोबर काल टीम इंडियाचा भाग असलेल्या क्रिकेटरने आपल्या सर्व गोष्टींचे श्रेय माजी कर्णधार एमएस धोनीला दिले आहे.
मोहालीला खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात (India vs Afghanistan t20) भारताने अफगाणिस्तानवर 6 गडी राखून विजय मिळवला. पहिली फलंदाजी करताना अफगाणिस्तानने आपल्या 20 षटकांत 5 विकेट्स गमावत 158 धावा केल्या. यात अनुभवी मोहम्मद नबी याने 27 चेंडूत 42 धावांची जबरदस्त खेळी केली. आव्हानाचा सामना करताना भारताने फक्त 4 विकेट्स गमावत, सहज विजय मिळवला. शिवम दूबेच्या(ShivamDube) 60 धावांच्या मदतीने केवळ 17.3 षटकांत मिळालेले आव्हान पार पाडले. जितेश शर्माने 20 चेंडूत 31 तर रिंकूने केवळ 9 चेंडूत 16 धावा करत मोलाची भूमिका निभावली. (IND v AFG 2024: “He just told me to react according to the ball”- Rinku Singh on MS Dhoni’s advise)
रिंकूचे वक्तव्य, धोनीने दिलेल्या ‘टीप्स’ चा केला खुलासा (MS Dhoni)
सामन्यानंतर रिंकू त्याच्या फिनीशर पोजिशनबद्दल बोलला. या जागेवर बॅटिंग करण्याबाबत धोनीने त्याला मार्गदर्शन केले असल्याचे त्याने सांगितले. रिंकू म्हणाला, ”नंबर 6 वर बॅटिंग करण्याची आता मला सवय झाली असून, मला ते आवडायलाही लागले आहे. ‘नंबर 6 वर बॅटिंग करताना मी स्वत:शीच बोलत असतो. माझ्याकडे सेट होण्यासाठी जास्त चेंडू मिळणार नाही याची मला जाण आहे. माही भाईंंनी पण मला बॅटवर आलेल्या चेंडूच्या मेरिटवर खेळण्याचा सल्ला मला दिला आहे.” (‘Mahi bhai told me to react according to the ball)
रिंकूने आत्तापर्यंत खेळलेल्या 13 टी20 सामन्यांतील 9 डावात फलंदाजी केली आहे. यात 69.50 ची सरासरी आणि तब्बल 180 च्या स्ट्राइक रेटने त्याने 278 धावा जमवल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
IND vs AFG: मोहालीच्या थंडीने खेळाडू गारटले, लाइव्ह सामन्यादरम्यानच रोहितचे झाले वाईट हाल