---Advertisement---

T20 World Cup: विश्वचषकासाठी टीम इंडियाला सापडला ऑलराऊंडर प्लेअर, पंड्याची जागा धोक्यात!

Indian-Cricket-Team
---Advertisement---

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. भारताकडून या सामन्यात शिवम दुबेने शानदार कामगिरी केली. त्यामुळे तोच भारताच्या विजयाचा हिरो ठरला. शिवमने  गोलंदाजी करताना 2 षटकात 9 धावा खर्च करुन एक विकेट्स घेतली आणि फलंदाजीमध्ये 40 चेंडूत 60 धावा करुन नाबाद राहिला. याचमुळे शिवम सध्या टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 

अफगाणिस्तान संघावर विजय मिळाल्यानंतर शिवम दुबे म्हणाला, “मला माहिती आहे की टी20 क्रिकेटमध्ये कशी फलंदाजी करतात. यामुळे मी मोठे षटकार मारु शकतो, यामुळेचं मी कोणत्याही वेळेस धावा काढू शकतो. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर आज मला संधी मिळाली आणि मी तेच केले ज्याची मला अपेक्षा होती.”

शिवम दुबे गुरुवारच्या प्लेईंग कंडिशनबद्दल म्हणाला, ‘मोहालीमध्ये जास्त थंडी आहे पण मला इकडे खेळून आनंद आला. जास्त वेळ खेळण्याचा आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा माझ्यावर दबाव होता. माझ्या मनात एकचं चालू होते की मला माझा नैसर्गिक खेळ खेळायचा आहे. प्रथम 2-3 चेंडू खेळताना माझ्यावर दबाव असतो पण त्यानंतर मी फक्त चेंडूवर लक्ष केंद्रित करतो आणि जे चालू आहे त्याविषयी जास्त विचार करत नाही.’

सामनावीर ठरलेल्या शिवमला बऱ्याच दिवसांनी टीम इंडियात संधी मिळाली. त्यानेही मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यामुळे विश्वचषकात त्याच्याकडे एक प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. 30 वर्षीय शिवमने 18 टी20 आणि 1 वनडे सामना टीम इंडियाकडून खेळला आहे. त्याची आयपीएलमधील कामगिरीही चांगली राहिली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या राहिलेल्या दोन टी20 आणि आयपीएल 2024 शिवमचे विश्वचषकाचे तिकीट पक्के करतेय का, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (T20 World Cup Team India has found an all-rounder for the World Cup, Pandya’s place is in danger)

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AFG: ‘पंड्याचा लवकरच होणार संघातून पत्ता कट?’, ‘या’ युवा अष्टपैलूने ठोकला जागेवर दावा
रोहित आणि गिलमध्ये LIVE सामन्यात राडा, विजयानंतर कर्णधाराने जिंकले मन; म्हणाला, ‘माझी एवढीच इच्छा होती की….’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---