ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत पहिल्यांदाच मालिकावीराचा पुरस्कार जिंकणारा अक्षर पटेल याने त्याच्या प्रदर्शनाने सगळ्यांना प्रभावित केले आहे. त्याने आपल्या गोलंदाजाच्या कौशल्याने संघाला रविंद्र जडेजा याची उणीव भासू दिली नाही. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 8 विकेट्स घेतल्या. त्याने पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी केली आणि जडेजाची कमतरता दूर केली. काहींनी अक्षरने त्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर केला.
क्रिकबजशी बोलताना अजय जडेजा म्हणाला, “अक्षर पटेल मोहाली येथे खेळलेल्या पहिल्या सामन्यात गोलंदाजीत गुणवत्ता दाखवली. त्याने मिळालेल्या संधीचा चांगला फायदा केला. आम्ही रविंद्र जडेजाची आठवण काढत होतो, मात्र गोलंदाजीसाठी नाही. अक्षरने ती चांगली केली आहे. तो फलंदाजीही उत्तमच करतो, मात्र क्षेत्ररक्षण करताना तो जडेजासारखा नाही.”
मालिका निर्णयाकाच्या सामन्यात अक्षर पटेल (Axar Patel) याने ऍरॉन फिंच, मॅथ्यू वेड आणि जोश हेझेलवूड यांची विकेट घेतली. फिंच आणि वेड हे संपूर्ण मालिकेत लयीत दिसले. त्यांना बाद करण्याचे भारतासमोर एक आव्हानच होते आणि त्या दोघांना अक्षरने बाद केले. हे त्याचे भारताच्या मालिकाविजयात महत्वाचे योगदान ठरले.
सध्याच्या भारतीय संघाबाबत बोलताना अजय म्हणाले, “संघ स्थिर वाटत आहे. ज्याला जी जबाबदारी दिली आहे ती ते योग्यतेने पार पाडत आहे. तसेच टी20 विश्वचषकापूर्वी भारताचा ऑस्ट्रेलियावरील हा विजय महत्वाचा आहे.”
रविंद्र जडेजा हा भारताचा अष्टपैलू खेळाडू आहे. तो गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही चांगली कामगिरी करतो. त्याचे क्षेत्ररक्षण तर एकदम जबरदस्त आहे. हे त्याने नेहमीच दाखवून दिले आहे. मात्र सध्या तो दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने टी20 विश्वचषकासही मुकला आहे. त्यामुळे संघात अक्षरची एंट्री झाली. अक्षरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धसाठीही संघात घेतले आहे. तसेच तो टी20 विश्वचषकातही भारताच्या मुख्य संघामध्ये आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संजूची लागली लॉटरी? विश्वचषकाच्या तोंडावर टीम इंडियात मिळणार महत्त्वाची जबाबदारी
INDvSA: युवा पंतवर कार्तिकचा अनुभव पडणार भारी! आकडेवारी कोणाची क्लास वन, घ्या जाणून
दिग्गज गोलंदाजाचा दीप्ति शर्माला सपोर्ट! म्हणाले, ‘नॉन स्ट्रायकरला रनआऊट करणे योग्य, पण…’