---Advertisement---

लखनऊ वनडेत टीम इंडियाची प्रथम गोलंदाजी; सामना प्रत्येकी 40 षटकांचा

INDvSA Toss
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका जिंकल्यावर भारत आता वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. यातील पहिला सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाला. या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थित शिखर धवन संघाचे नेतृत्व करतोय. या सामन्यात शिखरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

पाऊस झाल्याने षटकांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही संघ प्रत्येकी 40-40 षटके खेळणार आहेत. यामुळे प्रत्येक गोलंदाज 8 षटके टाकणार आहेत.

भारतीय संघ सहा फलंदाज आणि पाच गोलंदाजसह उतरला आहे. भारताच्या अंतिम अकरामध्ये रुतूराज गायकवाड आणि रवी बिश्नोई यांना जागा दिली आहे. यामुळे त्यांचे हे भारताकडून आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे, तर संजू सॅमसन याच्यावर विकेटकीपिंगची जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा राहुल त्रिपाठी याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे तर रजत पाटीदार यालाही अंतिम अकरामध्ये जागा दिली नाही.

दक्षिण आफ्रिकेमध्ये क्लासेन, मलान आणि तबरेझ शम्सी संघात परतले आहेत, तर आफ्रिकी संघाला एक धक्काही बसला आहे. ड्वेन प्रिटोरियन हा वनडे मालिकेतून आणि टी20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. त्याला तिसऱ्या टी20मध्ये दुखापत झाली होती. यामुळे त्याच्याजागी मार्को यान्सेन याला संघात घेतले आहे, मात्र विश्वचषकाबाबतचा निर्णय अजून जाहीर केला नाही.

पहिल्या वनडेसाठी दोन्ही संघांची प्लेईंग इलेवन:

भारतीय संघ – शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, रूतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, आवेश खान.

दक्षिण आफ्रिका- जानेमन मलान, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बवुमा (कर्णधार), एडन मार्करम, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पार्नेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेझ शम्सी.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Asia Cup 2022: शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात थायलंडचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय
T20 World Cup: दुखापतीतून सावरलेल्या ‘या’ खेळाडूसमवेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाणा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---