गुवाहाटीमध्ये रविवारी (2 ऑक्टोबर) झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला (INDvSA)16 धावांनी पराभूत केले. यामुळे भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयामध्ये उपकर्णधार केएल राहुल याने प्रमुख भुमिका बजावली. त्याचबरोबर मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव यानेही चांगसी फलंदाजी केली. या दोघांनी जबरदस्त स्ट्राईक रेटने अर्धशतकी खेळी केल्या. सामन्यानंतर राहुलला सामनावीर घोषित केले गेले. हा पुरस्कार घेताक्षणी त्याने चकीत करणारे विधान केले आहे.
केएल राहुल (KL Rahul) याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला तेव्हा तो म्हणाला, “मला सामनावीराचा पुरस्कार मिळाला हे आश्चर्यकारक आहे, कारण या पुरस्काराचा खरा हकदार सूर्या असून तोच गेमचेंजर आहे.”
या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने 22 चेंडूत 5 चौकार आणि तेवढेच षटकार खेचत 61 धावा केल्या. त्याने विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबत 102 धावांची भागीदारी रचली, मात्र फलंदाजी करताना थोडी गडबड झाल्याने तो धावबाद झाला नाहीतर तो आणखी मोठी खेळी करू शकला असता.
“मधल्या फळीत फलंदाजी केल्याचा अनुभव असल्याने मला माहित आहे तेथे किती अवघड आहे फलंदाजी करणे. दिनेश कार्तिकला कमी चेंडू खेळायला मिळतात आणि त्यामध्ये तो उत्तम फलंदाजी करतो. तसेच विराट आणि सूर्या देखील असाधारण खेळाडू आहेत. सामना सुरू झाल्यावर मला आणि रोहितला वाटले या खेळपट्टीवर 180-185 धावसंख्या उभारू, मात्र खेळपट्टीने आम्हाला चकित केले,” असेही राहुलने पुढे म्हटले आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. राहुलने कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत भारताच्या डावाला चांगली सुरूवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. रोहितने 43 आणि राहुलने 57 धावा केल्या.
या मालिकेतील तिसरा टी20 सामना 4 ऑक्टोबरला इंदौर येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO | मिचेल जॉन्सन आणि युसूफ पठाणमध्ये भर मैदानात हातापायी, पाहा नेमकं काय घडलं
टेन्शन वाढलं! हर्षल-अक्षर आणि अर्शदीपला मिळून चोपल्या गेल्या 160 धावा
आता फक्त सूर्यकुमारला खुश ठेवायचे आहे! विजायानंतर कर्णधार रोहित शर्माची खास प्रतिक्रिया