---Advertisement---

थोडा चेंज! INDvsAFG तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहितने मजेमजेत घेतली फलंदाजी, संघात तीन महत्वाचे बदल

On: बुधवार, जानेवारी 17, 2024 6:41 PM
Rohit Sharma Ibrahim Zadran
---Advertisement---

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना बुधवारी (17 जानेवारी) खेळला जात आहे. पहिल्या दोन सामन्या विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या सामन्याच नाणेफेक जिंकली आहे. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार, असा निर्णय कळवला.

दरम्यान, मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तिसऱ्या सामन्यात देखील भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) याने फलंदाजीचा निर्णय घेतला. “आम्ही दोन वेळा गोलंदाजी केली. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात आम्ही फलंदाजी घेत आहोत. खेळपट्टीशी या निर्णयाचा काहीच संबंध नाही.”

या सामन्यातसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल पाहायला मिळाले. अक्षर पटेल, अर्शदीप सिंग आणि जितेश शर्मा यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी कुलदीप यादव, आवेश खान आणि संजू सॅमसन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली आहे.

(IND vs AFG 3rd T20I Rohit Sharma has won the toss. India will be batting first)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन – 
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान – इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.

बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या – 
Deepfake । मास्टर ब्लास्टर सचिनही अडकला जाळ्यात, तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगावर व्यक्त केली चिंता
यशस्वी जयस्वालची लॉटरी! अक्षर पटेल टॉप 5 मध्ये, ICC Ranking मध्ये बाबरही फायद्यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---