भारतीय संघाने अफगाणिस्तान संघाविरुद्धच्या सामन्यात एक मोठा बदल केला. हाच बदल भारतासाठी महत्त्वाचा ठरला. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 9वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर रंगला. या सामन्यात शार्दुल ठाकूर याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले. संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर टाकलेला विश्वास अष्टपैलू खेळाडूने सार्थ ठरवला. शार्दुलने क्षेत्ररक्षणातून दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
खरं तर, या सामन्यात नाणेफेक जिंकत अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याने इब्राहिम जादरान याच्यासोबत मिळून संघाला चांगली सुरुवात करून दिली. गुरबाज टिच्चून फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, डावातील 13व्या षटकात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या चौथ्या चेंडूवर त्याने फटका मारला आणि सीमारेषेवर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने अविश्वसनीय झेल घेत फलंदाजाला तंबूत पाठवले.
शार्दुलने टिपला झेल
गुरबाज 28 चेंडूंचा सामना करून 21 धावांवर खेळत होता. तो क्रीझवर टिच्चून फलंदाजी करत होता. कर्णधार रोहित शर्मा याने विकेटच्या शोधात चेंडू पंड्याच्या हातात सोपवला. यावेळी पंड्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर गुरबाजने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळासाठी असे वाटले की, चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे जाईल. मात्र, तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या शार्दुलने गुरबाजच्या आशांवर पाणी फेरले.
शार्दुलने आधी सीमारेषेवर चेंडू टिपला, पण त्याचे संतुलन बिघडत असल्याचे पाहून त्याने चेंडू हवेत फेकला. तसेच, स्वत: सीमारेषेच्या पलीकडे गेला. यानंतर शार्दुल पुन्हा सीमारेषेच्या आत जाऊन सहजरीत्या हा झेल पूर्ण केला. शार्दुलचा हा झेल पाहून पंड्यासह विराट कोहली हादेखील आनंदी झाला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CyQRbmqPE8J/
अश्विनच्या जागी शार्दुलला संधी
या सामन्यात शार्दुल ठाकूर याला अफगाणिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विन याच्या जागी सामील केले आहे. शार्दुल चेंडूसोबतच बॅटमधूनही योगदान देण्याची क्षमता राखतो. भारतीय संघ दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्यात शार्दुल आणि पंड्यासह एकूण 4 वेगवान गोलंदाजांसह उतरला आहे. (ind vs afg cwc 2023 shardul thakur took stunner catch on boundary line of rahmanullah gurbaz hardik pandya see video)
हेही वाचा-
इथे सुट्टी नाही! मैदानात उतरताच नवीनला प्रेक्षकांनी घेतले फैलावर, लागले कोहली..कोहलीचे नारे
मोठी बातमी! एशियन गेम्समध्ये भारताला सुवर्ण पदक देण्यावर अफगाणी खेळाडूचा आक्षेप; म्हणाला…