IND vs AFG 1st T20: मोहाली येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा (IND vs AFG) 6 विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह यजमानांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयाचा हिरो शिवम दुबे होता, ज्याने 40 चेंडूत नाबाद 60 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो संघासाठी सुरुवातीला चुकीचा ठरला. प्रथम खेळताना अफगाणिस्तानने रहमानउल्ला गुरबाज (Rahmanullah Gurbaz) आणि इब्राहिम झद्रान ( Ibrahim Zadran) यांनी पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केल्याने चांगली सुरुवात झाली. मात्र, यानंतर भारतीय संघाने 7 धावांच्या आत तीन विकेट घेत शानदार पुनरागमन केले. यानंतर मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याच्या 27 चेंडूत 42 धावांच्या खेळीच्या जोरावर अफगाण संघाने 5 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात शिवम दुबे (Shivam Dube) आणि जितेश शर्मा (Jitesh Sharma) यांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने 17.3 षटकांत चार विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. दुबेच्या अष्टपैलू कामगिरीबाबत ट्विटरवर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. एका युजरने लिहिले की, ‘शिवम दुबेमध्ये हार्दिक पंड्यासाठी भारताला बॅकअप मिळाला आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले, “हार्दिक पंड्या निवृत्त, शिवम दुबे आता त्याची जागा घेणार आहे.” (IND vs AFG Pandya to be cut from team soon? This young all-rounder stakes claim for place)
India have found Hardik Pandya's backup in Shivam Dube ✅ #INDvAFG #INDvsAFG
— Syed Asif officel (@SyedAsif119) January 11, 2024
'हार्दिक पांड्या की हुई छुट्टी' #shivamdube is here #INDvsAFG
— Rahul VBs (@iamrahulvbs) January 11, 2024
Shivam Dube the New all rounder of India 🇮🇳#INDvAFG pic.twitter.com/tA6oaP95pz
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) January 11, 2024
हेही वाचा
भारताला रडवणाऱ्या फलंदाजाने टेनिसच्या मैदानावर दिली जोकोविचला टक्कर, पाहा व्हायरल व्हिडीओ
रोहित आणि गिलमध्ये LIVE सामन्यात राडा, विजयानंतर कर्णधाराने जिंकले मन; म्हणाला, ‘माझी एवढीच इच्छा होती की….’